‘त्या’ फॅन्सी प्लेटवरील दंडाची किंमत 10,300 रुपये

गाडीच्या क्रमांकासाठी क्रिएटिव्हिटी पणाला लावून ‘आई’, ‘भाई’, ‘दादा’ वगैरेसारखा आकार देणाऱ्या वाहनचालकांच्या अनेक तक्रारी नागपुर पोलीस विभागाकडे आल्या आहेत. अशा वाहन चालकांविरुद्ध कारवाई करण्याचा दृष्टीकोनातून एक मोहीम सुरू करण्याचा विचार वाहतूक पोलीस विभाग करत होता. अशावेळी एक असा वाहनचालक पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित यांच्या हाती लागलाय ज्यामुळे डोक्यात असलेल्या मोहिमेचा नकळत श्री गणेशा झाला आहे. […]

‘त्या’ फॅन्सी प्लेटवरील दंडाची किंमत 10,300 रुपये

गाडीच्या क्रमांकासाठी क्रिएटिव्हिटी पणाला लावून ‘आई’, ‘भाई’, ‘दादा’ वगैरेसारखा आकार देणाऱ्या वाहनचालकांच्या अनेक तक्रारी नागपुर पोलीस विभागाकडे आल्या आहेत. अशा वाहन चालकांविरुद्ध कारवाई करण्याचा दृष्टीकोनातून एक मोहीम सुरू करण्याचा विचार वाहतूक पोलीस विभाग करत होता. अशावेळी एक असा वाहनचालक पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित यांच्या हाती लागलाय ज्यामुळे डोक्यात असलेल्या मोहिमेचा नकळत श्री गणेशा झाला आहे. पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित यांनी ज्यावेळी या गाडीचे अवलोकन केले तेव्हा त्या वाहन चालकाने कोणते-कोणते नियम मोडले आणि याचा दंड किती होईल याचा हिशोब केला तेव्हा दंडाची रक्कम चक्क 10 हजार 300 रुपयांपर्यंत जाऊन पोहचली.

काय होतं या वाहनाच्या नंबर प्लेटवर?

मध्य भारतात सर्वाधिक दुचाकींचा संख्या ही नागपूर शहरातच आहेत.

त्यातही कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांकडे सर्वाधिक दुचाकी आहेत.

त्यामुळे आपली गाडी इतरांच्या गाडीपेक्षा वेगळी कशी दिसेल यावरच नागपुरातील तरुणाईचा भर असतो. अशा वाहनांची संख्या वाढत असल्याने वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित यांनी स्वतः एका बुलेट चालकावर कारवाई केली आहे.

‘आदत बुरी है लेकीन शौक ऊंचे है’ अशा आशयाची नंबर प्लेट लावून मिरवणाऱ्या वाहन चालकावर डिसीपीने चक्क 10 हजार 300 रुपयांचा दंड ठोठावला आहे.

मोटार वाहन कायदा-1988 आणि मोटर वाहन नियम-1989 यांच्या अनुसार वाहनांवर फॅन्सी नंबर प्लेट लावणे अवैध आहे.

तरीही शहरात असंख्य वाहनचालकांची ‘भाई’गिरी सुरू आहे.

गुन्हेगारी कारवायांमध्ये वापरण्यात येणाऱ्या वाहनांची ओळख पटू नये, म्हणून फॅन्सी नंबर प्लेट लावल्या जातात.

त्या वाहन चालकाला जुन्याच मोटार वाहन कायद्या प्रमाणे दंड करण्यात आला आहे.

नवा कायदा सध्यातरी महाराष्ट्रात लागू झालेला नसल्याने दंडाची रक्कम 10 हजार 300 रुपयांवर निभावली, अन्यथा ही रक्कम किती तरी पटीने वाढली असती…

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number