पुण्यातील चंदननगरमध्ये पेईंग गेस्ट म्हणून राहत असेलेल्या दोन तरुणींना पेईंग गेस्ट चालविणाऱ्या दोन बहिणींनी कोंडून ठेवून मारहाण केली आहे. खोली खाली करताना ठेव रक्कम मागितल्याच्या कारणावरून भाडेकरू दोन मुलींना घर मालकणिकडून मारहाण करण्यात आली. याप्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
चंदननगरमध्ये पेईंग गेस्ट म्हणून राहत असलेल्या दोन तरुणींना पेईंग गेस्ट चालविणाऱ्या दोन बहिणीनी कोंडून ठेवून मारहाण केली. खोली खाली करताना ठेव रक्कम परत मागीतल्याच्या कारणावरुन भाड़ेकरू दोन मुलींना घर मालकिणीकडून मारहाण करण्यात आली. चंदनगरमध्ये हा प्रकार घडला असून चंदननगर पोलिस ठाण्यात बुधवारी रात्री याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पल्लवी चक्रनारायण आणि रुचिता चक्रनारायण अशी या मारहाण झालेल्या मुलींची नावे आहेत. त्यानी चंदननगर पोलिस ठाण्यात तृप्ती माने आणि श्वेता थोरात यांच्याविरोधात कोंडून ठेवून मारहाण केल्याची तक्रार नोंदवली आहे.