सातारा : पाटण विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढतीची शक्यता आहे. महायुतीकडून पाटणची जागा शिवसेनेला मिळाली आहे. शिवसेनेचा उमेदवार जाहीर झाला आहे. मविआकडून ठाकरे सेनेचे जिल्हाध्यक्ष हर्षद कदम यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे शरद पवार गटाचे सत्यजित पाटणकर अपक्ष लढणार असल्याची सूत्रांकडून माहिती मिळत आहे. पाटणकर लढल्यास पाटणमध्ये तिरंगी लढत होईल.