नुकत्याच झालेल्या मंत्रीमंडळ विस्तारात सोलापूरच्या आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांना मंत्रीमंडळात स्थान मिळालेलं नाही. आपण या गोष्टीमुळे जराही नाराज नसल्याचं जरी प्रणिती शिंदे म्हणत असल्या, तरी त्यांचे कार्यकर्ते मात्र आपला रोष लपवू शकलेले नाहीत. युवक कॉंग्रेसचे (Congress) जिल्हाध्यक्ष नितीन नागणे याने काँग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी (Sonia Gandhi) आणि राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्याकडे प्रणिती शिंदे यांना मंत्रीपद देण्यासंबंधी मागणी केली आहे ते पण चक्क रक्ताने पत्र लिहून…

या पद्धतीने आता युवक कॉंग्रेसचे अनेक कार्यकर्ते आपल्या रक्ताने पक्षाध्यक्षांना पत्रं (letters) लिहिणार असल्याचं नागणे यांनी म्हटलं आहे. कॉंग्रेस पक्षासाठी आयुष्य वाहिलेले सुशिलकुमार शिंदे यांनाही राज्यसभा निवडणुकीत (Elections) डावललं होतं. आता आमदार प्रणिती शिंदे यानाही मंत्रीपद न दिल्याने कॉंग्रेस कार्यकर्ते नाराज आहेत. आमदार प्रणिती शिंदे याना मंत्रीपद देऊन न्याय देण्याची मागणी युवक कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी केली आहे.