High Profit Film: फक्त 12 लाखांचं बजेट अन् 1600 कोटींची कमाई! ‘या’ हॉरर सिनेमानं रचला इतिहास; पाहा कशी घडली ही किमया

इतक्या कमी बजेटचा चित्रपट इतिहासातील सर्वाधिक नफा कमावणाऱ्यांमध्ये कसा पोहोचला, ही कथा थक्क करणारी आहे.

High Profit Film: फक्त 12 लाखांचं बजेट अन् 1600 कोटींची कमाई! ‘या’ हॉरर सिनेमानं रचला इतिहास; पाहा कशी घडली ही किमया

हॉलिवूडमध्ये प्रचंड बजेटच्या चित्रपटांची नेहमीच चर्चा होत असते, पण कधी कधी अत्यंत कमी खर्चात बनलेला एखादा चित्रपटही असा इतिहास घडवतो की मोठ्या ब्लॉकबस्टर चित्रपटांनाही मागे टाकतो. असाच चमत्कार घडवला पॅरानॉर्मल अ‍ॅक्टिव्हिटी (Paranormal Activity) या हॉरर चित्रपटाने. अत्यंत मर्यादित बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने कमाईच्या बाबतीत विक्रम मोडले.

हा चित्रपट साधारण 10 ते 15 हजार डॉलर्स म्हणजेच सुमारे 12 लाख रुपयांच्या मायक्रो बजेटमध्ये तयार करण्यात आला होता. मात्र प्रदर्शित झाल्यानंतर त्याने जागतिक स्तरावर शेकडो मिलियन डॉलर्सची कमाई केली. 2007 साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि पुढे त्याचे अनेक भागही प्रदर्शित करण्यात आले.

या चित्रपटाचे दिग्दर्शन ओरेन पेली यांनी केले होते. अतिशय मर्यादित साधनसामग्रीत हा चित्रपट चित्रीत करण्यात आला. कथाही अत्यंत साधी होती, एका जोडप्याच्या घरात घडणाऱ्या रहस्यमय घटनांचे कॅमेऱ्यात रेकॉर्डिंग. मात्र ‘फाउंड फुटेज’ या शैलीमुळे प्रेक्षकांना एक वेगळाच अनुभव मिळाला.

चित्रपटात मोठे स्टार नव्हते, लोकेशनही जवळपास एकच घर होते आणि चित्रीकरणही अत्यंत कमी दिवसांत पूर्ण करण्यात आले होते. तरीही चित्रपटातील भीती इतकी वास्तवदर्शी वाटली की प्रेक्षकांनी त्याला मोठ्या प्रमाणात पसंती दिली.

हेही वाचा: Ashok Kharat Case: भोंदू खरातचा पाय आणखी खोलात; सहाव्या गुन्ह्यात 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

सुरुवातीला हा चित्रपट मर्यादित स्क्रीनवर प्रदर्शित करण्यात आला होता. मात्र प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद पाहता त्याचा प्रदर्शित विस्तार वाढवण्यात आला. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने तब्बल 1600 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली, जी त्याच्या बजेटच्या तुलनेत आश्चर्यकारक होती.

कमीत कमी खर्च आणि प्रचंड कमाई यामुळे हा चित्रपट सिनेमा इतिहासातील सर्वाधिक नफा मिळवणाऱ्या चित्रपटांपैकी एक मानला जातो. गुंतवणुकीवरील परतावा लक्षात घेतल्यास या चित्रपटाने हजारो टक्क्यांचा नफा कमावला, जो काही अहवालांनुसार 13,000 टक्क्यांहून अधिक असल्याचे सांगितले जाते.

सुरुवातीला हा चित्रपट फिल्म फेस्टिव्हलमध्ये दाखवण्यात आला होता, जिथे त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. त्यानंतर पॅरामाउंट पिक्चर्स या निर्मिती संस्थेने त्याचे हक्क विकत घेतले आणि पोस्ट-प्रॉडक्शनसाठी सुमारे 2 कोटी रुपये खर्च केले होते. 

हेही वाचा: New Chatting App: एलॉन मस्कचा मास्टर स्ट्रोक! चॅटिंगसाठी आणलं स्वतंत्र 'हे' खास ॲप; व्हॉट्सॲपला देणार टक्कर?

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number