महाराष्ट्रातले निवडणूक लढविणारे सर्वात श्रीमंत उमेदवार पराग शाह

घाटकोपर पूर्वचे भाजप उमेदवार पराग शाह यांनी 500 कोटीँची संपत्ती जाहीर केली आहे. त्यांची एकूण संपत्ती 543 कोटी 76 लाख 42 हजार 343 रुपये आहे. त्यांनी भाजपचे मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांची एकूण संपत्ती 441 कोटी असून यांना त्यांनी मागे टाकले आहे. प्रतिज्ञापत्रात संपत्ती जाहीर पराग शाह महाराष्ट्रातले निवडणुक लढविणारे सर्वात श्रीमंत उमेदवार आहेत. मुंबई […]

महाराष्ट्रातले निवडणूक लढविणारे सर्वात श्रीमंत उमेदवार पराग शाह

घाटकोपर पूर्वचे भाजप उमेदवार पराग शाह यांनी 500 कोटीँची संपत्ती जाहीर केली आहे. त्यांची एकूण संपत्ती 543 कोटी 76 लाख 42 हजार 343 रुपये आहे. त्यांनी भाजपचे मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांची एकूण संपत्ती 441 कोटी असून यांना त्यांनी मागे टाकले आहे.

प्रतिज्ञापत्रात संपत्ती जाहीर

पराग शाह महाराष्ट्रातले निवडणुक लढविणारे सर्वात श्रीमंत उमेदवार आहेत. मुंबई महानगर पालिकेत पराग शाह नगरसेवक आहेत. पराग शाह बांधकाम व्यावसायीक असून ते मुंबई,गुजरात आणि चेन्नई मध्ये ते व्यवसाय करतात.

पराग शाह यांची संपत्ती मंगलप्रसाद लोढा यांच्यापेक्षा जास्त असून मुंबई भाजप अध्यक्ष मंगलप्रसाद लोढा यांची संपत्ती 442 कोटी आहे. समाजवादी पक्षाचे नेते अबु आझमी यांची संपत्ती 220 कोटी आहे.

पराग शहा यांचे कौटुंबिक उत्पन्न 30 कोटी 60 लाख कोटी रुपये इतके आहे. तर त्यांच्या पत्नीच्या नावे 175 कोटी रूपयांची संपत्ती दाखवण्यात आली आहे. 2017 मध्ये मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकीत देखील ते सर्वात श्रीमंत उमेदवार ठरले होते.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number