राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीचं रण तापायला सुरुवात झाली आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर जोरदार शाब्दिक हल्ले-प्रतिहल्ले करत आहेत. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे देखील कंबर कसून प्रचाराच्या मैदानात उतरल्या आहेत. परळीतील वैजनाथ मंदिर आणि रस्ते विकास कामांच्या शुभारंभ सोहळ्यादरम्यान उपस्थितांसोबत संवाद साधताना पंकजा मुंडेंनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावर सडकून टीका केली.
आम्ही दुष्काळमुक्त मराठवाडा करणारे आहोत, धरणात लघुशंका करण्याची भाषा बोलणारे मराठवाडा दुष्काळमुक्त करणार आहेत. जे परळीचा नाला स्वच्छ करू शकले नाहीत. ते लोक धरणाची कामं करणार आहेत का? या लोकांची लायकी नाही. लायकी नसणाऱ्या लोकांच्या पाठीमागे उभे राहणाऱ्याची लायकी कमी होते.
परळीचे लोक हुशार आहेत, लोकल निवडणुकीत लोकल नेत्याला पकडता आणि मोठ्या निवडणुकीत मोठ्या नेत्यांना साथ देतात’, असं म्हणत पंकजांनी धनंजय मुंडेंवर टीकास्त्र सोडलं.
येथे परत येणार नाही असं नाही, तर आणखी मोठी होऊन येणार आहे. बस खूप झालं आता माझ्या लोकांची कामं करायची आहेत, पण माझ्या हातात शक्ती नसेल तर काम कसं करता येईल. हे दुसऱ्या लोकांना जमणार नाही मला फक्त परळीत यशस्वी होऊन जमणार नाही. तर मला बीड जिल्हा मराठवाडा, संपूर्ण महाराष्ट्र बुक करायचा आहे. पुन्हा एकदा महाराष्ट्रात बहुमताच सरकार आणायचं आहे