पाकिस्तान भारतासोबत व्यापारी संबंध तोडणार

जम्मू-काश्मीरमधील कलम 370 आणि 35ए हटवल्यानंतर विरोधकांनी टीका केली. तसेच कलम 370 हटवल्यामुळे पाकिस्तानचा चांगलाच जळफळाट झाला आहे. पाकिस्तानने भारतासोबत व्यापारी संबंध तोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर भारताच्या निर्णयाविरोधात संयुक्त राष्ट्र संघटनेमध्ये दाद मागणार असल्याचे पाकिस्तानने म्हटलं आहे. त्यामुळे दोन्ही देशात तणावाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काय आहेत पाकिस्तानचे निर्णय ? भारतासोबत […]

पाकिस्तान भारतासोबत व्यापारी संबंध तोडणार

जम्मू-काश्मीरमधील कलम 370 आणि 35ए हटवल्यानंतर विरोधकांनी टीका केली. तसेच कलम 370 हटवल्यामुळे पाकिस्तानचा चांगलाच जळफळाट झाला आहे. पाकिस्तानने भारतासोबत व्यापारी संबंध तोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर भारताच्या निर्णयाविरोधात संयुक्त राष्ट्र संघटनेमध्ये दाद मागणार असल्याचे पाकिस्तानने म्हटलं आहे. त्यामुळे दोन्ही देशात तणावाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

काय आहेत पाकिस्तानचे निर्णय ?

भारतासोबत राजनैतिक संबध कमी करणार.

भारतासोबत व्यापारी सबंध तोडणार.

पाकमधील भारतीय उच्चायुक्तांना देश सोडण्याचे आदेश.

भारतातून पाक राजदूताला माघारी बोलावलं.

दूतावासातील कर्मचारी,अधिकाऱ्यांची संख्या कमी करणार.

दोन्ही देशातल्या द्विपक्षीय संबधावर पुनर्रविचार.

युनो आणि सुरक्षा परिषदेत हा प्रश्न उपस्थित करणार.

१४ ऑगस्ट काश्मीरी जनतेच्या समर्थनार्थ साजरा करणार.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number