Pakistan Singer Talha Anjum: पाकिस्तानला मिरच्या झोंबल्या; भारताचा झेंडा त्यांच्याच गायकाने अभिमानाने फडकवला, म्हणाला…

पाकिस्तानात संताप व्यक्त होत असताना भारतात त्याच्या कृतीचे स्वागत करण्यात आले. तल्हाने “कलेला सीमा नसते” असे म्हणत टीकेला थेट उत्तर दिले.

Pakistan Singer Talha Anjum: पाकिस्तानला मिरच्या झोंबल्या; भारताचा झेंडा त्यांच्याच गायकाने अभिमानाने फडकवला, म्हणाला…

भारत – पाकिस्तान संबंध नेहमीच तणावपूर्ण राहिले आहेत. पाकिस्तान सतत भारताबद्दल विषारी राजकारण करत असताना, त्याच देशातील एका कलाकाराने असे काही केले की पाकिस्तानातील नागरिकांची भुवया उंचावल्या. पाकिस्तानी रॅपर तल्हा अंजुम याने नेपाळमधील एका कॉन्सर्टदरम्यान भारतीय तिरंगा फडकावून प्रचंड खळबळ उडवली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तो प्रेक्षकांपैकी एका भारतीय चाहत्याकडून तिरंगा घेतो आणि तो अभिमानाने डोक्यावर फिरवतो. त्यानंतर खांद्यावर ठेवून स्टेजवरच परफॉर्मन्स करत राहतो.

ही दृश्ये पाहून पाकिस्तानमध्ये अक्षरशः संतापाचा स्फोट झाल्याचे दिसत आहे. पाकिस्तान कायम भारतविरोधी अजेंडा रेटत असताना, त्याच देशातील कलाकाराने भारतीय ध्वजाला मान दिला, हे त्यांच्या राष्ट्रीय अहंकाराला पचलेच नाही. अनेक पाकिस्तानी नागरिकांनी सोशल मीडियावर तल्हावर तोंडसुख घेतले असून त्याला ‘मर्यादा विसरलेला कलाकार’ म्हटले जात आहे. दुसरीकडे, भारतातील अनेकांनी त्याच्या या कृतीचे स्वागत केले असून “पाकिस्तानमधून कोणीतरी मानवतेला महत्त्व देतोय” अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

हेही वाचा: Fraud Case : इन्स्पेक्टर, बँक मॅनेजर कोणालाच नाही सोडलं…लग्न करून तिने कोट्यावधी रुपये उकळले, नेमकं घडलं काय?

चर्चा तापल्यानंतर तल्हा अंजुमने एक्सवर प्रतिक्रीया देत टीकेला करारा उत्तर दिले. “माझ्या कलेला सीमा नाहीत. मला राजकारण करायचे नाही. मानवतेपलीकडे काही नाही. भारतीय ध्वज हातात घेतल्यामुळे वाद झाला तर होऊदे… मी ते पुन्हा करेन,” असे तो ठामपणे म्हणाला. शिवाय, पाकिस्तानातील युद्धखोर सरकार व माध्यमांच्या भारतविरोधी प्रचाराला थेट टोला लगावत त्याने “उर्दू रॅप कधीच सीमांनी अडखळलेला नाही” असेही म्हटले. कराची येथे जन्मलेला तल्हा अंजुम 2012 पासून "यंग स्टनर्स" या रॅप जोडीमुळे ओळखला जाऊ लागला. आज तो पाकिस्तानातील लोकप्रिय हिप-हॉप कलाकारांमध्ये गणला जातो. 2024 मध्ये तो "कटार कराची" या वेबसीरिजमध्येही दिसला होता. त्याचे Instagram वर 30 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत आणि त्याची अनेक रॅप गाणी दक्षिण आशियात गाजली आहेत.

भारतीय तिरंग्याबद्दल आदर दाखवणाऱ्या तल्हाचा हा निर्णय भारतातील प्रेक्षकांना सकारात्मक वाटला असला, तरी पाकिस्तानला मात्र हे अजिबात रुचले नाही. भारतावर सतत टीका करणारे आणि शत्रुत्व पसरवणारे पाकिस्तानचे राजकीय नेते, कलाकार, आणि जनता या एका कृतीमुळे संतापाने पेटले आहेत. भारतविरोधी प्रचार करणाऱ्या पाकिस्तानी समाजाला एका कलाकारानेच आरसा दाखवला, यातच अनेकांना समाधान वाटत आहे.

हेही वाचा: Mumbai CNG Crisis : रिक्षा, टॅक्सी, बससाठी मुंबईकरांची मोठी परेड! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत वाहतूकसेवा विस्कळीत

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number