पद्म पुरस्कारांचा वितरण सोहळा राष्ट्रपती भवनात संपन्न

  २०२०सालासाठी जाहीर झालेल्या देशातील पद्म पुरस्कारांचा वितरण सोहळा दिल्लीतील राष्ट्रपती भवनात पार पडला. देशातील विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्या १४१ जणांना राष्ट्रपतींकडून पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली होती. आणि अखेर आज राष्ट्रपती भवनात हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. प्रसिद्ध गायक अदनान सामी, आणि अभिनेत्री कंगना रणावत […]

पद्म पुरस्कारांचा वितरण सोहळा राष्ट्रपती भवनात संपन्न

  २०२०सालासाठी जाहीर झालेल्या देशातील पद्म पुरस्कारांचा वितरण सोहळा दिल्लीतील राष्ट्रपती भवनात पार पडला. देशातील विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्या १४१ जणांना राष्ट्रपतींकडून पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली होती. आणि अखेर आज राष्ट्रपती भवनात हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. प्रसिद्ध गायक अदनान सामी, आणि अभिनेत्री कंगना रणावत यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.

 देशाची बॅडमिंटनपटू पी.व्ही सिंधूने दोन वेळा ऑलम्पिक पदक जिंकले आहे. तसेच मागील वर्षी पीव्ही सिंधू वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू आहे. त्यामुळे या यशस्वी देशकामगिरीबद्दल पीव्ही सिंधू यांनादेखील क्रिडा क्षेत्रातील पद्मभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले. माजी परराष्ट्र मंत्री सुष्मा स्वराज, माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली, जॉर्ज फर्नांडिस यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. बीजमाता राहीबाई पोपरे यांचादेखील पद्म पुरस्काराने सत्कार करण्यात आला. तसेच आयसीएमआरचे माजी मुख्य शास्त्रज्ञ डॉ. रमण गंगाखेडकर यांनाही पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आला. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अमित शहा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number