Asaduddin Owaisi: "माझ्या यशावर भाजप जळतेय!" असदुद्दीन ओवैसींचा भाजपवर थेट प्रहार

फिक्सिंगचे आरोप फेटाळत त्यांनी एमआयएम स्वतंत्रपणे निवडणुका लढवत राहील, असा ठाम दावा केला.

Asaduddin Owaisi: &quotमाझ्या यशावर भाजप जळतेय!&quot असदुद्दीन ओवैसींचा भाजपवर थेट प्रहार

मुंबई: निवडणुकांच्या धामधुमीत एमआयएम आणि भाजप यांच्यातील राजकीय संघर्ष अधिकच तीव्र झाला असून, एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी भाजपवर थेट आरोप करत वादग्रस्त विधान केले आहे. भाजपकडून सातत्याने होत असलेल्या टीका, युतीच्या अफवा आणि ‘फिक्सिंग’च्या आरोपांना उत्तर देताना ओवैसी यांनी आपली आक्रमक भूमिका स्पष्ट केली असून, या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

एमआयएम (AIMIM) प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी भाजपवर थेट आरोप करत वादग्रस्त विधान केले आहे. “माझ्या यशावर भाजपचे लोक जळतात,” असे स्पष्ट शब्दांत सांगत ओवैसी यांनी भाजपकडून होत असलेल्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले. निवडणुकीच्या काळात एमआयएमवर सातत्याने आरोप केले गेले, मात्र त्यामागे राजकीय असूया असल्याचा दावा त्यांनी केला.

ओवैसी यांनी आपल्या पक्षाच्या ताकदीबाबत आत्मविश्वास व्यक्त करत सांगितले की, “माझ्या पक्षाचे तब्बल 125 नगरसेवक मी निवडून आणले आहेत.” भाजपसोबत ‘फिक्सिंग’ केल्याच्या आरोपांना त्यांनी फेटाळून लावत, “हे आरोप म्हणजे ‘नाचता येईना अंगण वाकडे’ याचाच नमुना आहे,” अशी टीका केली. एमआयएम स्वतंत्रपणे निवडणुका लढवत राहील, हेही त्यांनी ठामपणे स्पष्ट केले.

निवडणूक प्रचारादरम्यान भाजपने अनेक वेळा एमआयएमवर टीका केली होती. विशेषतः अकोटमध्ये भाजप आणि एमआयएम युती झाल्याच्या चर्चा पसरवल्या गेल्या होत्या. मात्र या चर्चा निराधार असून भाजपच अशा अफवा पसरवत असल्याचा आरोप ओवैसी यांनी केला. “जनतेला गोंधळात टाकण्यासाठीच अशा चर्चा मुद्दाम केल्या जात आहेत,” असे ते म्हणाले.

हेही वाचा: SC On Shiv Sena : शिंदे की ठाकरे, धनुष्यबाण कोणाचं? सर्वोच्च न्यायालयानं सुनावणी पुढे ढकलली; आता ‘या’ दिवशी होणार फैसला

ओवैसी यांनी बिहारमधील राजकीय घडामोडींचाही उल्लेख करत भाजपवर गंभीर आरोप केले. “तुम्ही आमची चार विधेयके रद्द केली. बिहारमध्ये हे काही साधे काम होते का? हा तर सरळ निर्लज्जपणा आहे,” अशा शब्दांत त्यांनी भाजपवर निशाणा साधला. मात्र तरीही जनता आमच्या पाठीशी उभी असल्याचा दावा त्यांनी केला.

“महाराष्ट्रात जनतेने एमआयएमला मतदान करून हे सिद्ध केले आहे की आम्ही जनतेचा विश्वास जिंकला आहे,” असे सांगत ओवैसी यांनी आगामी काळातही पक्षाची वाटचाल सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट केले. कोणत्याही दबावाला बळी न पडता एमआयएम आपली राजकीय लढाई पुढे नेत राहील, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.

दरम्यान, भाजपचे मंत्री संजय शिरसाट यांनी यापूर्वी स्पष्टपणे सांगितले होते की, भाजप कधीही AIMIM सोबत जाणार नाही. “आम्हाला एमआयएम नकोच आहे,” असे विधान त्यांनी केले होते. या पार्श्वभूमीवर ओवैसी आणि भाजप यांच्यातील राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.

हेही वाचा: Vijay Wadettiwar : ‘झालं गेलं आता गंगेला…’; प्रतिभा धानोरकरांसोबतच्या वादावर विजय वडेट्टीवार यांचं सूचक वक्तव्य

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number