‘मविआ सरकारमध्ये आमचे नुकसानच’ – हेमंत पाटील

महाविकास आघाडीमध्ये आमचे शंभर टक्के नुकसान होत असून आमचा वापर केला जात असल्याची खंत शिवसेनेचे खासदार हेमंत पाटली यांनी व्यक्त केली आहे. हेमंत पाटील यांनी काँग्रेसचे नेते अशोश चव्हाण यांच्या कार्यावर प्रश्न उपस्थित करत केवळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशामुळेच सर्व सहन करत असल्याचे वक्तव्य हेमंत पाटील यांनी केले आहे. सरकार आहे म्हणून कोणी गर्व […]

‘मविआ सरकारमध्ये आमचे नुकसानच’ – हेमंत पाटील

महाविकास आघाडीमध्ये आमचे शंभर टक्के नुकसान होत असून आमचा वापर केला जात असल्याची खंत शिवसेनेचे खासदार हेमंत पाटली यांनी व्यक्त केली आहे.

हेमंत पाटील यांनी काँग्रेसचे नेते अशोश चव्हाण यांच्या कार्यावर प्रश्न उपस्थित करत केवळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशामुळेच सर्व सहन करत असल्याचे वक्तव्य हेमंत पाटील यांनी केले आहे. सरकार आहे म्हणून कोणी गर्व करू नये, असेही ते म्हणाले.

आम्ही आहोत म्हणून सरकार आणि सत्ता आहे, हे विधान अशोक चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. त्यामुळे चव्हाणांच्या याच विधानवर हेमंत पाटील यांनी टोला लगावला आहे. ते म्हणाले, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नसते तर तुम्ही कुठे असता? असा प्रश्न हेमंत पाटील यांनी अशोक चव्हाणांना उपस्थित केला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number