आमची श्रद्धा शेतकऱ्यांपाशी – शरद पवार

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी अयोध्या दौऱ्यावर आहेत. रविवारी मुख्यमंत्री शिंदे अयोध्येत रामलल्लाचं दर्शन घेऊन शरयू नदीवर महाआरती करणार आहेत. शिंदेंच्या अयोध्या दौऱ्यात शिवसेनेचे आमदार, खासदार सहभागी झाले आहेत. तर भाजप नेतेही अयोध्यात पोहचले आहेत. दरम्यान, या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी टीका केली आहे. शरद पवार म्हणाले, सध्या राज्यात […]

आमची श्रद्धा शेतकऱ्यांपाशी – शरद पवार

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी अयोध्या दौऱ्यावर आहेत. रविवारी मुख्यमंत्री शिंदे अयोध्येत रामलल्लाचं दर्शन घेऊन शरयू नदीवर महाआरती करणार आहेत. शिंदेंच्या अयोध्या दौऱ्यात शिवसेनेचे आमदार, खासदार सहभागी झाले आहेत. तर भाजप नेतेही अयोध्यात पोहचले आहेत. दरम्यान, या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी टीका केली आहे.

शरद पवार म्हणाले, सध्या राज्यात अनेक महागाई आणि बेरोजगारीचे प्रश्न भेडसावत आहेत. तर धर्म-जातीवर वाद सुरू आहे. अशातच, अवकाळी पावसाने राज्याला झोडपून काढले आहे. ऐन उन्हाळाच्या दिवसात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झालं आहे. असे असताना, सर्वांना घेऊन अयोध्येया जायचं हे न पटणारे आहे. त्यामुळे प्राधान्य कोणत्या गोष्टीला दिलं पाहिजे हे आधी ठरवा, अशी टीका शरद पवार यांनी केली आहे. तसेच अयोध्या दौऱ्याचा कार्यक्रम हा त्यांचा आहे. अयोध्या दौरा हा त्यांच्यासाठी श्रद्धेचा प्रश्न आहे. त्यामुळे त्यांची श्रद्धा तिथं आहे. मात्र, आमची श्रद्धा ही राज्यातील शेतकऱ्यांसाठी आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या डोळ्याचं पाणी कसं पुसता येईल, त्यांना कशापद्धतीने मदत करता येईल, यात आमची श्रद्धा असल्याचं शरद पवार म्हणाले.

‘कर्नाटकात काँग्रेसचे सरकार येणार’

राजकारणाबाबत पवार म्हणाले, प्रत्येक पक्षाला एखाद्या प्रश्नावर स्वत:च मत मांडण्याचा अधिकार आहे. बोलताना कसं बोलावं, कोणत्या प्रश्नासाठी आग्रह धरावा हा लोकशाहीत प्रत्येकाला अधिकार आहे. तसेच, कर्नाटकात भाजपाचा पराभव होऊन काँग्रेसचे सरकार येणार असा विश्वासही शरद पवार यांनी व्यक्त केला आहे. तर कर्नाटकात काही जागांवर राष्ट्रवादी उमेदवार देणार असल्याचंही पवार म्हटले आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number