‘आपल्या देशाला लहरी राजा लाभला आहे’

आरबीआयने २००० च्या नोटीबद्दल दिलेल्या निर्णयावर अनेकजण मत व्यक्त करत आहेत. दरम्यान, संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जहरी टीका केली आहे. ‘आपल्या देशाला लहरी राजा लाभला आहे’ अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. तर, लहरी राजा असेच निर्णय घेणार आहे. हे गृहीत धरुन आपण २०२४ चा काळ ढकलणार आहोत अशी टीका खासदार संजय […]

‘आपल्या देशाला लहरी राजा लाभला आहे’

आरबीआयने २००० च्या नोटीबद्दल दिलेल्या निर्णयावर अनेकजण मत व्यक्त करत आहेत. दरम्यान, संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जहरी टीका केली आहे.

‘आपल्या देशाला लहरी राजा लाभला आहे’ अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. तर, लहरी राजा असेच निर्णय घेणार आहे. हे गृहीत धरुन आपण २०२४ चा काळ ढकलणार आहोत अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली.कर्नाटकमधला भाजपाचा पराभव अत्यंत दारुण आहे. भाजपाला देशाची मानसिकता काय झाली आहे हे दाखवून देणारा निकाल आहे. कर्नाटकसारख्या राज्यात हिंदूंचे सर्वाधिक सण आणि उत्सव साजरे केले जातात. या हिंदुत्ववादी राज्याने नरेंद्र मोदी, अमित शाह आणि भाजपाचा पराभव केला आहे. हे सत्य भाजपाचे लोक का स्वीकारत नाहीत? असाही प्रश्न संजय राऊत यांनी विचारला आहे. असेच पराभव तुमच्या वाट्याला येणार आहेत असेही ते म्हणाले.

मुंबई महापालिका, ठाणे महापालिकांसह १४ महापालिकांच्या निवडणुका घेण्याची हिंमत तुम्ही का दाखवत नाही? मोदींना प्रचाराला येऊदेत, अमित शाह यांना प्रचार करु दे आणखी कुणालाही येऊदेत. इथे तंबू ठोकून बसलात तरी आमचं काही म्हणणं नाही. निवडणुका घ्या हीच आमची मागणी आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number