अपघाताच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

मुंबई, ३ जून २०२३, प्रतिनिधी :  ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यामध्ये शुक्रवारी सायंकाळी सातच्या सुमारास तीन रेल्वे गाड्यांचा मोठा अपघात झाला. या भयंकर अपघातातील मृतांची संख्या 233 वर पोहोचली आहे. ३०० च्या आसपास लोक गंभीर जखमी झाले आहेत. तसेच अपघातात आतापर्यंत ९०० पेक्षा जास्त प्रवासी जखमी झाले आहेत. शुक्रवारपासून सुरू असलेलं बचाव कार्य अजूनही सुरू आहे. हावडा-चेन्नई […]

अपघाताच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

मुंबई, ३ जून २०२३, प्रतिनिधी :  ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यामध्ये शुक्रवारी सायंकाळी सातच्या सुमारास तीन रेल्वे गाड्यांचा मोठा अपघात झाला. या भयंकर अपघातातील मृतांची संख्या 233 वर पोहोचली आहे. ३०० च्या आसपास लोक गंभीर जखमी झाले आहेत. तसेच अपघातात आतापर्यंत ९०० पेक्षा जास्त प्रवासी जखमी झाले आहेत. शुक्रवारपासून सुरू असलेलं बचाव कार्य अजूनही सुरू आहे.

हावडा-चेन्नई कोरोमंडल एक्प्रेसचे काही डबे रुळावरून घसरले होते. यात कुठलीही जीवितहानी झाली नव्हती. मात्र काही क्षणांतच या घसरलेल्या डब्यांवर समोरून येणारी ट्रेन धडकली, आणि होत्याच नव्हतं झालं. यशवंतपूर-हावडा सुपरफास्ट ट्रेनच्या चालकाला जवळच घडलेल्या अपघाताबाबत माहित नसावं. म्हणून त्याची ट्रेन पूर्ण वेगात होती. आणि हीच ट्रेन घसरलेल्या डब्यांवर जाऊन आदळली. शोध आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. NDRFच्या चार तुकड्या, ३० डॉक्टर, २०० पोलीस कर्मचारी आणि ६० रुग्णवाहिका घटनास्थळी आहेत. ओडिशा सरकारचे अनेक मंत्री देखील काल रात्रीच अपघाताच्या ठिकाणी दाखल झाले. मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी १० लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे, तर गंभीर जखमींना २ लाखांचं सहाय्य केलं जाणार आहे.

केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी घटनास्थळाची भेट घेतली. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला यावेळी बोलताना वैष्णव म्हणाले की,’ हा एक वेदनादायी आणि मोठा अपघात आहे. रेल्वे, एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि राज्य सरकार बचाव कार्य करत आहेत. उत्तम आरोग्य सुविधा पुरवल्या जात आहेत. काल भरपाई जाहीर करण्यात आली आहे. अपघातातील जखमींना सर्वतोपरी मदत केली जाईल. या अपघाताच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे.

या भीषण रेल्वे अपघाताचे कारण काय, असा प्रश्न विचारण्यात आल्यावर रेल्वेमंत्र्यांनी याबाबत भाष्य केले. “कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, रेल्वे मंत्रालयाने याप्रकरणी चौकशी समिती स्थापन केली आहे. समिती संपूर्ण प्रकरणावर लक्ष ठेवून आहे. या अपघातात जो कोणी दोषी असेल त्याला सोडले जाणार नाही. आपण स्वतः या प्रकरणाच्या तळाशी जाणार असून कारण हाती लागेपर्यंत गप्प बसणार नसणार आहोत,” असे अश्विनी वैष्णव म्हणाले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number