संसदेवर येत्या सोमवारी २९ नोव्हेंबरला काढण्यात येणारा ट्रॅक्टर मोर्चा स्थगित करण्याचा निर्णय आंदोलक शेतकऱ्यांनी घेतला आहे. सरकारने शेतकऱ्यांच्या अनेक मागण्या मान्य केल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी शेतकऱ्यांना दिले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी भाजप शासित राज्यांना आणि रेल्वेला आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी संयुक्त किसान मोर्चाने कली. एमएसपी, आंदोलनात मृत्यू झालेल्या शेतकरी आणि लखीमपूर खिरी हिंसाचाराच्या प्रकरणावर सरकार चर्चा करत नाही तोवर आंदोलन सुरूच राहणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे.