अधिवेशन कालावधी वाढवण्याची विरोधकांची मागणी फेटाळली

राज्यातील विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक येत्या २७ आणि २८ डिसेंबर रोजी होणार आहे. २७ डिसेंबर रोजी निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यात येईल तर २८ डिसेंबर रोजी मतदान पार पडणार आहे. मात्र १२ आमदार निलंबित असताना विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक कशी? असा सवाल भाजपने उपस्थित केला. यावेळी विरोधकांकडून हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची मागणी केली. १२ आमदार निलंबित असताना निवडणूक […]

अधिवेशन कालावधी वाढवण्याची विरोधकांची मागणी फेटाळली

राज्यातील विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक येत्या २७ आणि २८ डिसेंबर रोजी होणार आहे. २७ डिसेंबर रोजी निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यात येईल तर २८ डिसेंबर रोजी मतदान पार पडणार आहे. मात्र १२ आमदार निलंबित असताना विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक कशी? असा सवाल भाजपने उपस्थित केला.

यावेळी विरोधकांकडून हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची मागणी केली. १२ आमदार निलंबित असताना निवडणूक कशी? असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला. त्यामुळे विरोधकांनी अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची मागणी केली. मात्र राज्य सरकारने अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची विरोधकांची मागणी फेटाळली आहे. त्यामुळे हिवाळी अधिवेशन वेळापत्रकाप्रमाणे २८ डिसेंबर रोजी संपणार आहे.

२८ डिसेंबर रोजी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक पार पडणार आहे. मात्र अधिवेशनाच्या आखलेल्या वेळापत्रकाप्रमाणे इतक्या कमी दिवसांत जनतेच्या समस्या, त्यांचे प्रश्न कसे सोडवणार, असा सवाल विरोधक उपस्थित करत आहेत.

पृथ्वीराज चव्हाण काँग्रेसचे विधानसभा अध्यक्षपद उमेदवार असण्याची दाट शक्यता असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. काँग्रेस पक्षश्रेष्ठी यांचा चव्हाणांच्या बाजूने कल असल्याचे समजते. राज्यातील काँग्रेसअंतर्गत कलह टाळण्यासाठी ज्येष्ठ नेत्याचे नाव समोर आल्याची माहिती राज्य काँग्रेस सूत्रांनी दिली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number