ONGC Jobs Recruitment : लाखभर पगार मिळवून देणारी सरकारी नोकरी; ‘हे’ उमेदवार ठरणार पात्र, वाचा संपूर्ण तपशील

निवड झालेल्या उमेदवारांना वार्षिक 10 ते 12 लाख रुपयांपर्यंत वेतन दिले जाणार आहे.

ONGC Jobs Recruitment : लाखभर पगार मिळवून देणारी सरकारी नोकरी; ‘हे’ उमेदवार ठरणार पात्र, वाचा संपूर्ण तपशील

नवी दिल्ली: देशातील आघाडीची ऊर्जा कंपनी तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ (ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन, ओएनजीसी) यांनी गोवा येथे असलेल्या ॲडव्हान्स्ड ट्रेनिंग इन्स्टिट्यूटसाठी विविध वरिष्ठ पदांवर भरती जाहीर केली आहे. या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 3 मार्च 2026 पासून सुरू झाली असून इच्छुक उमेदवारांना 23 मार्च 2026 पर्यंत अर्ज करण्याची संधी मिळणार आहे. या अंतिम मुदतीनंतर कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नसल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. मुलाखतीची तारीख पुढे जाहीर केली जाणार आहे.

या भरती अंतर्गत कॅटरिंग हाउसकीपिंग आणि कन्सिअर्ज या विभागातील पदांसाठी उमेदवारांकडे हॉटेल किंवा हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंटमधील पदवी असणे आवश्यक आहे. संबंधित क्षेत्रातील अतिरिक्त प्रमाणपत्रे असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे. तसेच सेवा क्षेत्रात किमान सात वर्षांचा अनुभव अनिवार्य असून त्यापैकी किमान दोन वर्षे तिन-स्टार किंवा त्याहून अधिक दर्जाच्या हॉटेल किंवा रिसॉर्टमध्ये काम केलेले असणे आवश्यक आहे.

हेड (हॉर्टिकल्चर) या पदासाठी उमेदवारांकडे हॉर्टिकल्चर, ॲग्रीकल्चर किंवा फ्लोरीकल्चर आणि लँडस्केपिंग या विषयांमध्ये पदवी किंवा डिप्लोमा असणे गरजेचे आहे. या क्षेत्रात किमान सात वर्षांचा अनुभव आवश्यक असून त्यामध्ये किमान दोन वर्षे बागकाम किंवा गार्डन डिझाइन यासंबंधी प्रत्यक्ष कामाचा अनुभव असणे अपेक्षित आहे. हॉटेल किंवा रिसॉर्ट क्षेत्रातील बागायती व्यवस्थापनाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना विशेष प्राधान्य दिले जाईल.

हेही वाचा: Social Media Ban: 'या' राज्यातील सरकारचा मोठा निर्णय; 16 वर्षांखालील मुलांसाठी घातली सोशल मीडियावर बंदी

दरम्यान, हेड (ट्रेनिंग अँड डायव्हिंग) या पदासाठी उमेदवारांकडे भारतीय नौदलाचे डायव्हर ट्रेड सर्टिफिकेट किंवा पीएडीआय प्रमाणित डायव्हर (प्रोफेशनल असोसिएशन ऑफ डायव्हिंग इन्स्ट्रक्टर्स, पीएडीआय) प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. नियुक्तीपूर्वी वैध ऑफशोर मेडिकल आणि डायव्हिंग मेडिकल सर्टिफिकेट अनिवार्य आहे. त्यासोबतच हेलिकॉप्टर अंडरवॉटर एस्केप ट्रेनिंग, बेसिक लाइफगार्ड आणि फर्स्ट एड यांची प्रमाणपत्रे असणे आवश्यक असून किमान एक वर्ष प्रशिक्षण देण्याचा अनुभव असणे बंधनकारक आहे.

या भरती मोहिमेद्वारे कॅटरिंग, हाउसकीपिंग, कन्सिअर्ज अँड ओव्हरऑल एक्सपीरियन्स, हॉर्टिकल्चर आणि ट्रेनिंग अँड डायव्हिंग या विभागातील एका पदावर नियुक्ती केली जाणार आहे. वेतनाबाबत बोलायचे झाल्यास कॅटरिंग, हाउसकीपिंग आणि ट्रेनिंग अँड डायव्हिंग या पदांसाठी वार्षिक 12 लाख रुपये पर्यंत वेतन निश्चित करण्यात आले आहे. तर कन्सिअर्ज अँड ओव्हरऑल एक्सपीरियन्स आणि हॉर्टिकल्चर या पदांसाठी वार्षिक 10 लाख रुपये वेतन देण्यात येणार आहे.

निवड प्रक्रियेत सर्वप्रथम उमेदवारांच्या अर्जांची तपासणी केली जाईल आणि पात्र उमेदवारांची निवड यादी तयार केली जाईल. त्यानंतर निवडलेल्या उमेदवारांची वैयक्तिक मुलाखत घेतली जाईल. अंतिम टप्प्यात कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. मुलाखत आणि कागदपत्र पडताळणी यांच्या आधारे अंतिम उमेदवारांची निवड निश्चित केली जाईल.

इच्छुक उमेदवारांनी ओएनजीसीच्या अधिकृत संकेतस्थळावर www.ongcindia.com भेट देऊन ऑनलाइन नोंदणी करावी. अर्ज करताना सर्व माहिती काळजीपूर्वक भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे. अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याची प्रिंट काढून सुरक्षित ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. ऊर्जा क्षेत्रात करिअर घडवू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही संधी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

हेही वाचा: Maharashtra Bye-Elections 2026: राज्यात पुन्हा निवडणुकांची रणधुमाळी; राहुरी आणि बारामतीसाठी मोठी अपडेट समोर

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number