New Android Phone: दमदार फीचर्स आणि प्रीमियम श्रेणीमधील या फोनची होतीये सगळीकडे चर्चा

100W फास्ट चार्जिंग आणि 50MP कॅमेरा मिळण्याची शक्यता आहे. कंपनीने “Notify Me” पेज सक्रिय केले असून लाँच नोव्हेंबरअखेर होण्याची शक्यता आहे.

New Android Phone: दमदार फीचर्स आणि प्रीमियम श्रेणीमधील या फोनची होतीये सगळीकडे चर्चा

मुंबई: चीनच्या स्मार्टफोन कंपनी OnePlus ने भारतात आपला नवा स्मार्टफोन OnePlus 15R आणण्याची तयारी सुरू केली आहे. हा फोन नुकत्याच सादर केलेल्या OnePlus 15 चा तुलनेने हलके (watered-down) व्हर्जन असणार आहे. कंपनीने आपल्या अधिकृत वेबसाइटवर “Notify Me” पेज सक्रिय केले असून लाँचची उत्सुकता वाढली आहे. OnePlus 15R हा मागील वर्षी आलेल्या OnePlus 13R मॉडेलचे नेक्स्ट मोडेल ठरणार आहे.

यापूर्वी OnePlus फ्लॅगशिप मॉडेलसोबत R सीरीजचे स्मार्टफोन एकत्र लॉन्च करत असत. पण यंदा त्यांनी 15R स्वतंत्र पद्धतीने आणण्याचा निर्णय घेतला आहे. या फोनमध्ये Snapdragon 8 Elite प्रोसेसर, 16 GB RAM आणि 512 GB पर्यंतच्या स्टोरेजचे पर्याय मिळू शकतात. फोनमध्ये कंपनीचे नवीन OxygenOS 16 आणि Android 16 बेस असलेले सॉफ्टवेअर मिळण्याची शक्यता आहे. OnePlus 15R मध्ये प्रचंड 7,000 mAh बॅटरी मिळू शकते. यासोबत 100W फास्ट चार्जर, वायरलेस चार्जिंग आणि रिव्हर्स चार्जिंग फीचरही अपेक्षित आहे.

हेही वाचा:  PM Narendra Modi : बंगालमध्ये भाजपासाठी विजय असंभव; पंतप्रधान मोदींकडून पश्चिम बंगालच्या मंत्र्यांचं ‘चॅलेंज एक्सेप्टेड’

कॅमेराबद्दल बोलायचे झाले तर, यामध्ये 50 MP मुख्य कॅमेरा, त्यासोबत अल्ट्रावाइड आणि टेलिफोटो लेन्स मिळण्याची शक्यता आहे. सेल्फीसाठी 32 MP फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो. वाढलेल्या स्टोरेज कॉस्ट आणि सरासरी विक्री किंमतीमुळे OnePlus 15R ची किंमत 50,000 रुपयांपेक्षा अधिक असू शकते, अशी चर्चा आहे. OnePlus ने अद्याप अधिकृत लाँच डेट जाहीर केलेली नाही. मात्र हा स्मार्टफोन नोव्हेंबरच्या अखेरीस भारतात लॉन्च होण्याची शक्यता आहे.

सध्याची माहिती पाहता हा स्मार्टफोन प्रीमियम श्रेणीतील वापरकर्त्यांसाठी आकर्षक पर्याय ठरू शकतो. विशेषतः मोठी बॅटरी, प्रगत कॅमेरा, दमदार प्रोसेसर आणि OnePlus ची सिग्नेचर परफॉर्मन्स गुणवत्ता लक्षात घेतली तर 15R चे आगमन मोबाईल मार्केटमध्ये नव्या स्पर्धेला सुरुवात करू शकते. आता पाहावे लागेल की नोव्हेंबरच्या अखेरीस OnePlus आपल्या चाहत्यांना कोणते अंतिम सरप्राईज देतो.

हेही वाचा: Parineeti Chopra: परिणीती चोप्राने इंस्टाग्राम पोस्ट करून सांगितलं चिमुकल्याचं नाव; म्हणाली, त्याचे नाव दैवी…

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number