‘भारतामध्ये एक मूल, एक झाड संकल्पना राबवायला हवीच’, असे म्हणत अभिनेते सयाजी शिंदे यांच्याकडून पर्यावरण जनजागृती करण्यात आली आहे.
‘चैत्र क्रिएशन्स अँड पब्लिसिटी’ या संस्थेने पर्यावरण सप्ताह निमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ही संस्था महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांसाठी आवश्यक असणारे प्रबोधनपर साहित्य निर्माण करते. या संस्थेकडून आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात अभिनेते सयाजी शिंदे उपस्थित होते.
“पर्यावरण विषयक जनजागृती वाढवायची असेल तर, शालेय जीवनापासूनच लहान मुलांवर तसेच संस्कार करणे गरजेचे आहे”, असे अभिनेते सौयजी शिंदे यांनी म्हटले आहे. “झाडाचे बी शाळेत आणल्याशिवाय मुलांना शाळेत प्रवेश नाकारणे ही आजच्या पर्यावरणाची गरज आहे”, असे म्हणत भाषणादरम्यान अभिनेते सयाजी शिंदे यांनी पर्यावरणा संबंधित जनजागृती केली आहे.