NCP Sharad Pawar : शरद पवारांचे आमदारही फुटणार? उत्तम जानकर म्हणाले ‘अजित पवारांच्या पक्षात…’

ठाकरे गटातील बंडखोरीची घटना ताजी असताना शरद पवारांच्या राष्ट्रवादीलाही मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर शरद पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांनी मोठे राजकीय वक्तव्य केलयं

NCP Sharad Pawar : शरद पवारांचे आमदारही फुटणार? उत्तम जानकर म्हणाले ‘अजित पवारांच्या पक्षात…’

ठाकरेंचे सहा खासदार फुटल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. ठाकरे गटाचे बंडखोर खासदार आज शिवसेना वर्धापनदिनी शिवसेना एकनाथ शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या सध्या बोललं जात आहे. त्यामुळे ठाकरे गटाला मोठं खिंडार पडले आहे. 

अशातच ठाकरे गटातील बंडखोरीची घटना ताजी असताना आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीलाही मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कालच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिल्लीला जाऊन अमित शाहा यांची भेट घेतली. या भेटीनंतर आता शरद पवार गटाच्या आमदारांने मोठं वक्तव्य केल आहे. ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर शरद पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांनी म्हटलं की, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार अजित पवार यांच्या पक्षात जातील पण शिंदेसेनेत नाही.

हेही वाचा- Shivsena: शिवसेनेच्या वर्धापनदिनी 'त्या' सहा खासदारांचा पक्षप्रवेश होणार का? समोर आली मोठी अपडेट

"पवारांचे आमदार अजित पवारांच्या पक्षातील पण"-आमदार उत्तम जानकर
एकीकडे शिंदेंच्या शिवसेनेने ठाकरेंचे खासदार फोडल्यानंतर आता उत्तम जानकर यांनी केलेल्या या वक्तव्याकडे सर्वांच्या नजरा दोन्ही राष्ट्रवादीकडे फिरल्या आहेत. यावेळी माळशिरसचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आमदार उत्तम जानकर म्हणाले की, "ऑपरेशन टायगर, लायन बाबत मला माहिती नाही. पक्षाची गती आणि पवार साहेबांच वय अशा अनेक अडचणीत राष्ट्रवादी शरद पवार पक्ष अडकला आहे. शरद पवारांचे आमदार अजित पवार पक्षात जातील पण शिवसेनेत जाणार नाहीत" असं मोठं विधान आमदार जानकर यांनी केलं आहे. सध्या ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू असताना. आमदार उत्तम जानकर यांनी पक्षाच्या आमदार व खासदारांबाबत केलेले मोठे राजकीय वक्तव्य महत्वपूर्ण मानले जात आहे. 

हेही वाचा- Maharashtra Politics : ठाकरे गटाच्या फुटीनंतर पवारांच्या राष्ट्रवादीतही बंडाचा झेंडा? सुनेत्रा पवारांनी घेतली अमित शाहांची भेट; कारण काय?

सुनेत्रा पवारांनी घेतली अमित शाहांची भेट
तर दुसरीकडे ठाकरे यांच्या शिवसेनेतील सहा खासदारांनी बंडखोरी केल्याने सध्या राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडालेली आहे. शिवसेनेत या घडामोडी घडत असतानाच आता राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी आणखी एक माहिती समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार आता शरद पवार यांच्या पक्षातील काही खासदार हे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या संपर्कात आहेत. तसेच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्ली दौऱ्यावर गेल्याची माहिती समोर आली आहे.

काल उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि खासदार पार्थ पवार यांनी अमित शहा यांची भेट घेतली होती. यावेळी बैठकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची शाहा यांच्यासोबत अर्थ खात्याच्या संदर्भात चर्चा झाल्याचे म्हटले जात आहे. तसेच दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत कोणतीही चर्चा शहा यांच्याशी झाली नसल्याची सूत्रांची माहिती आहे. दरम्यान सुनेत्रा पवार अचानक दिल्ली दौऱ्यावर गेल्यामुळे आता शरद पवार यांचा देखील पक्ष फुटणार का? यावर देखील चर्चा सुरू झाली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number