कीर्तनकार इंदोरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली आहे.
इंदोरीकर महाराजांनी आपल्या एका किर्तनादरम्यान पुत्रप्राप्तीचा सम-विषम फॉर्म्युला सांगितला होता.
त्यांच्या या सम-विषम फॉर्म्युल्यामुळे ते चांगलेच अडचणीत सापडले आहे.
इंदोरीकर महाराजांनी ‘सम तिथीला स्त्रीसंग केल्यास मुलगा व विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते, असं वक्तव्य केलं होतं.
या विधानावरुन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी अंनिसने केली आहे.
एड. रंजना पगार-गवांदे यांनी अहमदनगरच्या जिल्हा शल्यचिकित्सकांना अर्ज लिहून मागणी केली आहे.
सोशल मीडियावर इंदोरीकर महाराजांच्या समर्थनार्थ मोहिम सुरु करण्यात आली आहे. अनेक जण इंदोरीकर महाराजांच्या समर्थनार्थ पोस्ट करत आहेत.
इंदोरीकर महाराजांनी केलेल्या विधानावरुन संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. अनेक जण त्यांच्या या वक्तव्याचं समर्थन करत आहेत. तर अनेकांनी या वक्तव्याचा विरोधही केला जात आहे.
दरम्यान इंदोरीकरांच्या वक्तव्यावरुन राजकारण चांगलचं तापलेलं आहे.