Omraje Nimbalkar : ‘त्या पाच खासदारांची धाकधूक वाढली’; ओमराजे निंबाळकरांचं पेचात टाकणारं वक्तव्य

मुंबई : पवनराजे निंबाळकर हत्येप्रकरणी आज, शनिवारी महत्त्वाचा निकाल समोर आला आहे. 20 वर्षांनंतर या प्रकरणाचा निकाल समोर येत असल्याने सर्वांचेच लक्ष या निकालाकडे लागले होते. काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे कार चालक समद काझी यांच्या हत्या प्रकरणातून राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार आणि माजी गृहराज्यमंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व नऊ आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली. […]

Omraje Nimbalkar : ‘त्या पाच खासदारांची धाकधूक वाढली’; ओमराजे निंबाळकरांचं पेचात टाकणारं वक्तव्य

मुंबई : पवनराजे निंबाळकर हत्येप्रकरणी आज, शनिवारी महत्त्वाचा निकाल समोर आला आहे. 20 वर्षांनंतर या प्रकरणाचा निकाल समोर येत असल्याने सर्वांचेच लक्ष या निकालाकडे लागले होते. काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे कार चालक समद काझी यांच्या हत्या प्रकरणातून राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार आणि माजी गृहराज्यमंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व नऊ आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली. माफीच्या साक्षीदाराची साक्ष विश्वासार्ह नसल्याचं सांगत विशेष सीबीआय कोर्टाचे न्यायाधीश सत्यनारायण नवांदर यांनी सबळ पुराव्यांअभावी हा निकाल दिला. या पार्श्वभूमीवर पवनराजे यांचे सुपुत्र आणि धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, सध्या राज्याच्या राजकारणात सुरू असलेल्या ऑपरेशन टायगर 2.0, खासदार पक्षांतरावरही त्यांनी सूचक वक्तव्य केले आहे. 

हेही वाचा : Raj Thackeray: ‘ऑपरेशन टायगरमागे अमित शाहांचा मास्टरप्लॅन…’; राज ठाकरेंनी केला 6 खासदारांच्या पक्षांतराचा खुलासा

निकालाबाबत ओमराजे निंबाळकर म्हणाले की, “हा निकाल दुर्दैवी आहे. कारण वीस वर्षांपासून आरोपींना शिक्षा व्हावी, यासाठी अखंडपणे आम्ही आणि तपास यंत्रणा प्रयत्न करत होत्या. या निकालाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार आहोत. माननीय कोर्टाच्या निकालावर भाष्य करण्यापेक्षा हायकोर्टात अपील करुन त्यांना सगळ्या गोष्टी पटवून देणं, हे महत्त्वाचं आहे”, असं खासदार ओमराजे निंबाळकर म्हणाले.

दरम्यान, ओमराजे निंबाळकर यांना शिंदे गटात प्रवेश करण्याबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, ही केस आणि माझ्या निर्णयाचा ठाकरे सेनेला सोडून शिंदेसेनेत प्रवेश करण्याच्या निर्णयाचा काहीही संबंध नाही. दोन वेगळ्या गोष्टी आहेत. मी अद्याप शिंदे सेनेत जाण्याचा निर्णय घेतलेला नाही. मला माझ्या धाराशिव मतदारसंघातील लोकांशी चर्चा करायची आहे. त्यांच्या भावना जाणून घ्यायच्या आहेत. माझ्या राजकीय निर्णयाबाबत मी मतदारसंघातील लोकांशी बोलून निर्णय घेईन,” असे मत ओमराजे निंबाळकरांनी मांडले. त्यामुळे शिंदे गटात सहा खासदार सामील झाले की नाही, याचा पेच अद्यापही कायम राहीला आहे. परिणामी, त्या पाच खासदारांची धाकधूक मात्र वाढली आहे. आता ओमराजे निंबाळकर नेमकी काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number