Shravan Somwar 2025: श्रावणी सोमवारी शिवलिंगावर कोणती शिवामूठ वाहावी? जाणून घ्या

श्रावणाच्या पहिल्या सोमवारी शिवलिंगावर शिवामूठ कशा पद्धतीने अर्पण करावी? तसेच, शिवलिंगावर शिवामूठ का वाहतात? चला तर सविस्तर जाणून घेऊया.

Shravan Somwar 2025: श्रावणी सोमवारी शिवलिंगावर कोणती शिवामूठ वाहावी? जाणून घ्या

मुंबई: उत्तर भारताच्या वैदिक पंचांगानुसार, श्रावण मास सुरू झाला आहे. मात्र, महाराष्ट्रासह इतर भागांमध्ये शुक्रवारपासुन श्रावण महिना सुरू होत आहे. श्रावण महिना अत्यंत पवित्र मानला जातो. यावर्षी, श्रावण महिन्यात गुरुपुष्यामृतयोग जुळून येत आहे. श्रावण महिन्याची सुरुवात अतिशय शुभ पद्धतीने करणे लाभदायी मानले जाते. मान्यतेनुसार, श्रावणाच्या पहिल्या सोमवारी शिवलिंगावर शिवामूठ अर्पण करण्याची प्रथा आहे. मात्र, अनेकांना हा प्रश्न पडला आहे की, श्रावणाच्या पहिल्या सोमवारी शिवलिंगावर शिवामूठ कशा पद्धतीने अर्पण करावी? तसेच, शिवलिंगावर शिवामूठ का वाहतात? चला तर सविस्तर जाणून घेऊया.

हेही वाचा: 'माझ्या वडिलांना अडकवण्यासाठी खडसे जबाबदार'; प्रफुल लोढाच्या मुलाने केला खळबळजनक दावा

श्रावणी सोमवारचे महत्त्व

देवशयनी एकादशीला भगवान विष्णू चार महिन्यांसाठी योगनिर्देत जातात. त्यामुळे, चातुर्मास काळात ब्रह्मांडाचे पालकत्व महादेवांकडे असते. तसेच, श्रावण महिना हा महादेवांची पूजा करण्यासाठी, त्यांचे नामस्मरण आणि उपासना करण्यासाठी महत्वाचा आणि शुभ मानला जातो. यासोबतच, सोमवार हा भगवान शिवाचा दिवस असल्याने, श्रावणातील प्रत्येक सोमवारचे विशेष महत्त्व आहे. श्रावणी सोमवारी शिवलिंगावर जलाभिषेक, दुधाभिषेक, रुद्राभिषेक आणि पंचामृत अभिषेकही मोठ्या प्रमाणात केला जातो. तसेच, दर सोमवारी भगवान शिवाला अर्पण केल्या जाणाऱ्या शिवामुठीचेही वेगळे महत्त्व आहे.

लग्न झाल्यानंतर, महाराष्ट्रातील स्त्रिया पहिली पाच वर्षे सलग शिवलिंगावर शिवामुठ वाहण्याचे व्रत करतात. या व्रतात श्रावणातील सर्व सोमवारी उपवास केला जातो. शिवलिंगाची पूजा केल्यानंतर, दर सोमवारी शिवलिंगावर पुढील क्रमाने मूठभर धान्य अर्पण केले जाते: तांदूळ, तीळ, मूग, जलपेनो आणि सातू. ही मूठ वाहताना, 'नम: शिवाय शान्ताय पंचवक्त्राय शूलिने। शृकङ्गिभृङ्गि-महाकालणयुक्ताय शम्भवे।।' असा मंत्र म्हणावा. तसेच, पाच वर्षांनी उपवास सोडावा. असे म्हटले जाते की, विधीनुसार शिवलिंगाची पूजा करून तसेच, ब्राह्मण आणि नातेवाईकांना शक्य तितके अन्न, भेटवस्तू आणि दक्षिणा देऊन या व्रताची समाप्ती करावी.

हेही वाचा:'तू मराठीत बोलू नको', फैझानच्या टोळीचा तरुणावर हॉकीस्टीकने हल्ला; कॉलेजबाहेर मोठा राडा

'या' दिवशी असणार पहिला श्रावणी सोमवार

28 जुलै 2025 रोजी, पहिला श्रावणी सोमवार आहे. या दिवशी शिवलिंगावर मुठभर तांदूळ अर्पण करावे. 

04 ऑगस्ट 2025 रोजी, दुसरा श्रावणी सोमवार आहे. या दिवशी शिवलिंगावर मुठभर तीळ अर्पण करावे. 

11 ऑगस्ट 2025 रोजी, तिसरा श्रावणी सोमवार आहे. या दिवशी शिवलिंगावर मुठभर मूग अर्पण करावे. 

18 ऑगस्ट 2025 रोजी, चौथा श्रावणी सोमवार आहे. या दिवशी शिवलिंगावर मुठभर जव अर्पण करावे. 

(DISCLAIMER: येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.)

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number