Jalgaon Audio Clip Controversy : एकनाथ खडसेंना शिवीगाळ, गिरीश महाजन आणि विजय चौधरी यांची कथित ऑडियो क्लिप व्हायरल

भाजपचे नेते विजय चौधरी आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यात झालेल्या संभाषणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार एकनाथ खडसे यांना अश्लील भाषेमध्ये शिवीगाळ करण्यात आली आहे.

Jalgaon Audio Clip Controversy : एकनाथ खडसेंना शिवीगाळ, गिरीश महाजन आणि विजय चौधरी यांची कथित ऑडियो क्लिप व्हायरल

भाजपचे नेते विजय चौधरी आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यात झालेल्या संभाषणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार एकनाथ खडसे यांना अश्लील भाषेमध्ये शिवीगाळ करण्यात आली आहे. विजय चौधरी यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्याशी बोलत असताना एकनाथ खडसे यांचा चांगलाच पान उतारा काढला आहे. इतकचं नव्हे तर त्यांनी रक्षा खडसे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केलं आहे. गेल्या काही वर्षांपासून खडसे विरूद्ध महाजन असा संघर्ष बघायला मिळतोय. त्यातच ही धक्कादायक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. त्यामुळे पुन्हा एकदा भाजपातील अंतर्गद वाद चव्हाट्यावर आल्याचे पाहायला मिळत आहे. 

हेही वाचा- Vijay Chaudhary Resignation: नंदुरबारमध्ये भाजपमधील अंतर्गत वाद पेटला; ‘त्या’ ऑडिओ क्लिपच्या वादानंतर भाजप नेते विजय चौधरींचा तडकाफडकी राजीनामा

यावेळी भाजपचे नेते विजय चौधरी यांनी म्हटलं की, ‘एकनाथ खडसे आणि त्याची मुलगी हे नेहमी भाजपवर टीका करत असतात आणि आपण त्यांच्या सुनेला मंत्री करून ठेवला आहे. हीच मंत्रिपद काढून घेतला पाहिजे, हे कुठेतरी थांबला पाहिजे. एकाच घरात तीन तीन जणांना वेगवेगळ्या पक्षांचे पद दिले जात आहे. केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांना मंत्रिपद काढून घ्यावे. खडसे उठल्या सुटल्या घाणेरडे आरोप करतो शिवीगाळ करतो.’

‘हे काहीतरी करावं लागेल रक्षा खडसे या मंत्रिमंडळात आहे. ते एकाच घरात राहतात एकमेकांना मदत करतात. हे कसं सहन करायचं आपण. भाऊ.. तुम्ही सांगा .. आदेश द्या, काय करायचं ते.. XXX लंगडा.. दर वेळेस काही ना काही घेऊन येतो…’ भाजपचे उत्तर महाराष्ट्र संयोजक विजय चौधरी आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांच्यातील एका कथित ऑडिओ क्लिपने सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number