रुपाली चाकणकरांवर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या दोघांना अटक

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या विरोधात समाज माध्यमातून आक्षेपार्ह, अश्लील आणि अपमानास्पद पोस्ट केल्याप्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

रुपाली चाकणकरांवर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या दोघांना अटक

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या विरोधात समाज माध्यमातून आक्षेपार्ह, अश्लील आणि अपमानास्पद पोस्ट केल्याप्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या विरोधात फेसबुकवरील "राजकारण महाराष्ट्राचे" या पेजवरून जाणीवपूर्वक आक्षेपार्ह पोस्ट वारंवार करण्यात येत होत्या. याप्रकरणी आयोगाकडून पोलिसांकडे तक्रार करण्यात आली होती. रुपाली चाकणकरांवर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या दोघांना आता अटक करण्यात आली असून रुपाली चाकणकर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा यांच्या तक्रारीनंतर पोलिसांकडून दोघांना अटक करण्यात आलीय. 

हेही वाचा: राजन साळवींचा उपनेतेपदाचा राजीनामा

या पूर्वी या प्रकरणात एकूण 9 आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून, अधिक तपास सुरू आहे. “राजकारण महाराष्ट्राचे” या फेसबुक पेजवरून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह, अश्लील आणि अपमानास्पद पोस्ट केल्याप्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांकडून भारतीय दंड संहिता कलम 78, 79, 351(3), 351(4), 61(2) BNS तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या 67A अंतर्गत मुंबई सायबर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी आकाश दिगंबर डाळवे (वय 30, रा. यावळे, ता. मोहोळ, जि. सोलापूर) आणि अविनाश बापू पुकळे (वय 30, रा. उरळी कांचन, जिल्हा पुणे) या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number