Navnath Waghmare On Rohit Pawar : "तो पळपुटा आहे, शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी नाही तर…" रोहित पवारांच्या उपोषणावर नवनाथ वाघमारेंची बोचरी टीका

शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीवर केलेल्या पंढरपूरातील रोहित पवारांच्या उपोषणावर ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी टीका केली आहे.

Navnath Waghmare On Rohit Pawar : &quotतो पळपुटा आहे, शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी नाही तर…&quot रोहित पवारांच्या उपोषणावर नवनाथ वाघमारेंची बोचरी टीका

सरसकट कर्जमाफी करावी या मागणीसह विविध मागण्यांसाठी आमदार रोहित पवार यांनी पंढरपूर येथे अन्नत्याग आंदोलन सुरू केले असून कर्जमाफी योजनेतील 2025-26 तसेच 26-27 ही अट काढून टाकून एक रूपयात पीक विमा देण्यात यावा शेतकऱ्यांना सरसकट 2 लाखाची मदत करून प्रोत्साहनपर मदत 75 हजार रुपये करावी तसा शब्द सरकारने आपल्याला द्यावा असे आवाहन आमदार रोहित पवार यांनी केलं.

दरम्यान तिसऱ्या दिवशी सरकारच्यावतीने रोहित पवारांच्या मागण्यांबाबत लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचे आश्वासन देण्यात आल्याने आमदार रोहित पवार यांनी आपले आंदोलन स्थगित केले. याचपार्श्वभूमिवर आता ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी रोहित पवार यांच्या उपोषणावर बोचक टीका केली आहे.

सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आलेला रोहित पवार, गोरगरीब सर्वसामान्य आंदोलकासारखं उपाशी राहू शकत नाही, सोन्यासारखं खायची सवय लागलेली आहे. रोहित पवार उपोषणस्थळावरून पळून गेला, तो पळपुटा आहे, शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी नाही, स्वतःचे घोटाळे झाकण्यासाठी उपोषनासाठी आलेला होता, असं म्हणत नवनाथ वाघमारे यांनी रोहित पवारांवर निशाणा साधला आहे. 

हेही वाचा- Uddhav thackeray : “आजचा दिवस माझा नाही, पण…” पक्षफुटीबाबत उद्धव ठाकरेंनी सोडलं मौन; पहिली प्रतिक्रिया समोर

नवनाथ वाघमारे म्हणाले की, सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आलेला रोहित पवार, गोरगरीब सर्वसामान्य आंदोलकासारखं उपाशी राहू शकत नाही, सोन्यासारखं खायची सवय लागलेली आहे. सत्तेत असताना शेतकऱ्यांचा विचार केला नाही, रोहित पवार शेतकऱ्यांसाठी काय आंदोलन करणार, हे आंदोलन नोंटकी होतं. स्वतःच्या कारखान्याचे घोटाळे दडपण्यासाठी शेतकऱ्याच्या आडून केलेले आंदोलन म्हणावं लागेल, अंतरवालीचा बोगलबाबा  उपोषणस्थळी गेला, रोहित पवार जरांगेचा आका बॉस आहे, आका उपोषणाला बसला म्हनून मिठाला जागावे लागले, उपकाराची परतफेड करण्यासाठी जरांगेनी पंढरपूरला भेट दिली.

रोहित पवार पळून गेला, तो पळपुटा आहे, शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी नाही, स्वतःचे घोटाळे झाकण्यासाठी तो आलेला होता. अंतरवालीचा बोगलबाबा उपोषणस्थळी भेट देण्यासाठी गेलाय.. कारण रोहित पवार जरांगेचा आका बॉस आहे, आका उपोषणाला बसला म्हनून मिठाला जागावे लागले, उपकाराची परतफेड करण्यासाठी जरांगेनी पंढरपूरला भेट दिली असल्याच नवनाथ वाघमारे यांनी म्हटलं आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number