नेत्यांचे ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून उल्लेख असलेले बॅनर लागताना पाहायला मिळत आहे. याआधी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार, आदित्य ठाकरे यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर विविध ठिकाणी झळकले आहेत. यात आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांची भर पडली आहे. कल्याणमध्ये नाना पाटोलेंच्या स्वागतासाठी लावण्यात आलेल्या बॅनरवर त्यांचा ‘भावी मुख्यमंत्री’ असा उल्लेख करण्यात आला आहे.
आता कल्याणमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या स्वागतासाठी बॅनर लावण्यात आले आहेत. त्यावर नाना पटोले यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख केल्याने राजकीय वर्तुळात पुन्हा नव्या चर्चांना उधाण आले आहे. कारण एकीकडे महविकास आघाडीमध्ये चर्चा बैठकांचा सपाटा सुरू असताना काँगेस, राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाकडून म्होरक्यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख करण्यात आलेले बॅनर लावले जात आहेत. हाच विषय चर्चेचा ठरत आहे.
एकीकडे महविकास आघाडीमध्ये चर्चा बैठकांचा सपाटा सुरू असताना काँगेस, राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून नेत्यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख करण्यात आलेले बॅनर मात्र चर्चेचा विषय ठरले आहेत.