नामांतराला स्थगिती नाही – उपमुख्यमंत्री

औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराला स्थगिती नाही असं मुख्यमंत्र्यांनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर नवी मुंबई विमानतळाला सुद्धा दि.बा. पाटलांचं नाव देण्यावर स्थगिती नाही असं त्यांनी सांगितलं आहे. त्यानंतर आमचा कोणीही सुपर मुख्यमंत्री नसून एकच मुख्यमंत्री आहे ते म्हणजे एकनाथ शिंदे  तेच आमचे प्रमुख असतात आणि तेच आमचे नेते असतात असं देवेंद्र फडणवीस […]

नामांतराला स्थगिती नाही – उपमुख्यमंत्री

औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराला स्थगिती नाही असं मुख्यमंत्र्यांनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर नवी मुंबई विमानतळाला सुद्धा दि.बा. पाटलांचं नाव देण्यावर स्थगिती नाही असं त्यांनी सांगितलं आहे. त्यानंतर आमचा कोणीही सुपर मुख्यमंत्री नसून एकच मुख्यमंत्री आहे ते म्हणजे एकनाथ शिंदे  तेच आमचे प्रमुख असतात आणि तेच आमचे नेते असतात असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

दरम्यान, त्यांनी यावेळी बोलताना आधीच्या सरकारने घेतलेले निर्णय हे अल्पमत असल्यामुळे बेकायदेशी होते. पण आता आम्ही नव्याने त्या निर्णयाची घोषणा करणार आहोत. त्यामुळे औरंगाबादचे नाव संभाजीनगर, उस्मानाबादचे नाव धाराशिव आणि नवी मुंबई विमानतळाचे नाव दि.बा.पाटील या नामांतराची आम्ही शनिवारी घोषणा करणार असल्याचं फडणवीसांनी स्पष्ट केलं आहे. ‘नामांतरावर मंत्रिमंडळ बैठकीत शिक्कामोर्तब होईल’ असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. सकाळी संजय राऊत यांनी केलेल्या टिकेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

काय म्हणाले होते संजय राऊत?

औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर आणि उस्मानाबादचं नामांतर धाराशिव करण्याच्या निर्णयाला एकनाथ शिंदे सरकारनं स्थगिती दिल्याचं वृत्त आलं होतं. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सरकारला जाब विचारला होता. शिवसेनेनं हिंदुत्व सोडलं म्हणणाऱ्यांनी आता औरंगाबादचं संभाजीनगर नामांतर का थांबवलं? औरंगजेब हा सरकारचा नातेवाईक कधीपासून झाला? मुळात असा निर्णय घेण्याचा अधिकार सरकारला नाही. हे सरकार बेकायदेशीर आहे. सुप्रीम कोर्टाची टांगती तलवार सरकारवर आहे. त्यामुळे काही काम नसल्यामुळे हे सरकार निर्णयांना स्थगिती देत सुटले आहे, असा घणाघात संजय राऊत यांनी केला होता. नागपूरमध्ये ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली होती. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदी असले तरीही खरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, त्यामुळे सरकारमधील गोंधळाच्या स्थितीसाठी फडणवीसांनाच प्रश्न विचारा, असं संजय राऊत म्हणाले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number