पुण्यात चांदणी चौकातील नव्या पुलाचे लोकार्पण

पुणे, १२ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : वाहतूक कोंडीमुळे चर्चेत राहणाऱ्या पुण्याच्या चांदणी चौकातील नव्या उड्डाणपुलाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लोकार्पण केले. उड्डाणपुलामुळे चांदणी चौकातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल. लोकार्पण सोहळ्याला नितीन गडकरी यांच्यासह मंचावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, भाजपच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी, नीलम गोऱ्हे, चंद्रकांत […]

पुण्यात चांदणी चौकातील नव्या पुलाचे लोकार्पण

पुणे, १२ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : वाहतूक कोंडीमुळे चर्चेत राहणाऱ्या पुण्याच्या चांदणी चौकातील नव्या उड्डाणपुलाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लोकार्पण केले. उड्डाणपुलामुळे चांदणी चौकातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल. लोकार्पण सोहळ्याला नितीन गडकरी यांच्यासह मंचावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, भाजपच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी, नीलम गोऱ्हे, चंद्रकांत पाटील हे उपस्थित होते.

जुना चांदणी चौक
मुंबई येथून साताऱ्याला जाण्यासाठी आणि साताऱ्याहून मुंबईला जाण्याकरिता प्रत्येकी दोन मार्गिका
मुळशीसाठी दोन मार्गिका
बावधन, मुळशी व एनडीएहून कोथरूडकडे जाणाऱ्या रस्त्यावर दोन मार्गिका
बावधनकडून येणाऱ्या रस्त्यावर तीव्र उतार
अनेकदा बावधन – चांदणी चौक पट्ट्यात वाहतूक कोंडी होत होती
स्थानिकांना चांदणी चौकातील मुख्य रस्त्यावरूनच ये-जा करावी लागत होती यामुळे वाहतूक कोंडीत भर पडत होती

नव्या रुपातील चांदणी चौक
उड्डाणपुलाची पहिली मार्गिका : मुळशी रस्ता ते सातारा / कोथरूडकडे जाण्यासाठी
उड्डाणपुलाची दुसरी मार्गिका : मुळशी रस्ता ते मुंबईकडे जाण्यासाठी
उड्डाणपुलाची तिसरी मार्गिका : मुळशी रस्ता ते बावधन / पाषाणकडे जाण्यासाठी
उड्डाणपुलाची चौथी मार्गिका : कोथरूड / सातारा रस्ता ते मुळशीकडे जाण्यासाठी
उड्डाणपुलाची पाचवी मार्गिका : एनडीए / बावधन रस्ता ते मुंबईकडे जाण्यासाठी
उड्डाणपुलाची सहावी मार्गिका : पाषाण / बावधन रस्ता ते सातारा / कात्रजकडे जाण्यासाठी
उड्डाणपुलाची सातवी मार्गिका : सातारा / कोथरूड रस्ता ते पाषाण / बावधनकडे जाण्यासाठी
उड्डाणपुलाची आठवी मार्गिका : सातारा / कोल्हापूर रस्ता ते मुळशी / पाषाण / बावधनकडे जाण्यासाठी
मुंबई ते सातारा मार्ग पूर्वी दोन लेनचा, आता तीन लेनचा
सातारा ते मुंबई मार्ग पूर्वी दोन लेनचा, आता तीन लेनचा
मुख्य रस्त्याच्या बाजूला दोन्ही बाजूने दोन सेवारस्ते अर्थात सर्व्हिस रोड

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number