नितेश राणेंना अटक होणार, वडिल नारायण राणेंनी वर्तवली शक्यता

कणकवलीत काही दिवसांपूर्वी एका शिवसैनिकावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी आमदार नितेश राणे यांना अटक होण्याची शक्यता आहे. खुद्द नितेश राणेंचे वडिल आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीच ही शक्यता व्यक्त केली आहे. या प्रकरणात नितेश राणे यांना नाहक गोवलं जात असल्याचा आरोपही नारायण राणे यांनी केला आहे. काय आहे प्रकरण? १८ डिसेंबर रोजी संतोष परब यांच्यावर कणकवलीत […]

नितेश राणेंना अटक होणार, वडिल नारायण राणेंनी वर्तवली शक्यता

कणकवलीत काही दिवसांपूर्वी एका शिवसैनिकावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी आमदार नितेश राणे यांना अटक होण्याची शक्यता आहे. खुद्द नितेश राणेंचे वडिल आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीच ही शक्यता व्यक्त केली आहे. या प्रकरणात नितेश राणे यांना नाहक गोवलं जात असल्याचा आरोपही नारायण राणे यांनी केला आहे.

काय आहे प्रकरण?

१८ डिसेंबर रोजी संतोष परब यांच्यावर कणकवलीत हल्ला झाला होता. संतोष परब करंजे गावचे माजी सरपंच आहेत. जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे समर्थक करंजे गावचे माजी सरपंच संतोष परब यांच्यावर अज्ञात इनोव्हा कारमधून आलेल्या दोघांनी टोकदार चाकूने वार केल्याने परब जखमी झाले होते. याप्रकरणी संशयित आरोपी सचिन सातपुतेला दिल्लीतून अटक करण्यात आली आहे. सचिन सातपुते हा नितेश राणे यांच्या स्वाभिमानी संघटनेचा कार्यकर्ता  असून परिणाणी नितेश राणे यांची चौकशी सुरू आहे.

याप्रकरणी नितेश राणे यांनी जबाब नोंदविला आहे. याप्रकरणाश काहीही संबंध नसल्याचे नितेश राणे यांनी सांगितले होते. मात्र आता खुद्द नितेश राणे यांचे वडिल नारायण राणे यांनी आमदार नितेश राणे यांना अटक होण्याची शक्यता वर्तवली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number