Nitesh Rane : ‘आम्ही कधीच एकमेकांवर टीका केली नाही’; नितेश राणेंनी सांगितलं निलेश राणेंसोबतच्या ‘त्या’ निवडणुकीचं सत्य

नगरपालिका निवडणुकांचा अनुभव मोलाचा ठरल्याचे सांगताना नितेश राणे म्हणाले की, “या निवडणुका लढवताना आम्हाला काय करावे आणि काय करू नये, याबाबत अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या.

Nitesh Rane : ‘आम्ही कधीच एकमेकांवर टीका केली नाही’; नितेश राणेंनी सांगितलं निलेश राणेंसोबतच्या ‘त्या’ निवडणुकीचं सत्य

मुंबई: भाजप आमदार नितेश राणे यांनी शिवसेना – भाजप संबंध, नगरपालिका निवडणुका, कुटुंबीयांचा पाठिंबा आणि नारायण राणे यांच्या वक्तव्यांबाबत स्पष्ट आणि संयत भूमिका मांडली. “कधीच ही निवडणूक शिवसेना विरुद्ध भाजप अशी नव्हती. आम्ही ती निवडणूक पूर्णपणे स्वबळावर लढलो,” असे नितेश राणे यांनी जय महाराष्ट्र न्यूजसोबत बोलताना ठामपणे सांगितले.

या निवडणुकीदरम्यान निलेश राणे यांच्याशी असलेल्या नात्यावर बोलताना नितेश राणे म्हणाले की, “मी कधीही निलेश राणेंवर टीका केली नाही आणि त्यांनीही माझ्यावर टीका केली नाही. आम्ही दोघांनीही एकमेकांवर किंवा एकमेकांच्या पक्षांवर टीकाटिप्पणी टाळली. त्यामुळे त्या निवडणुकीकडे केवळ राजकीय स्पर्धा म्हणूनच पाहिले पाहिजे.” नगरपालिका निवडणुकांमध्ये दोन्ही राणे बंधू वेगवेगळ्या पक्षांतून एकमेकांविरुद्ध उभे राहिले होते, मात्र त्याला वैयक्तिक संघर्षाचे स्वरूप देऊ नये, असे त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा: Uddhav-Raj Thackeray Interview : ‘भाजपचा हा मुंबई तोडण्याचा प्रयत्न सुरू आहे’; वाढवण बंदर, नवी मुंबई विमानतळाबाबत राज ठाकरेंनी केले धक्कादायक खुलासे

घरातून मिळालेल्या पाठिंब्याबाबत बोलताना नितेश राणे म्हणाले की, “वडील म्हणून नारायण राणे यांनी आम्हा दोघांनाही त्या काळात पूर्ण पाठिंबा दिला.” मात्र, दोन्ही मुलं वेगवेगळ्या पक्षांतून निवडणूक लढवत असल्यामुळे आई या वेळी प्रचारामध्ये सहभागी झाली नाही, हेही त्यांनी नमूद केले. कुटुंबीयांच्या भूमिकेमुळे निवडणूक अधिक संयमाने आणि समजूतदारपणे लढता आली, असे ते म्हणाले.

नगरपालिका निवडणुकांचा अनुभव मोलाचा ठरल्याचे सांगताना नितेश राणे म्हणाले की, “या निवडणुका लढवताना आम्हाला काय करावे आणि काय करू नये, याबाबत अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. या अनुभवातूनच पुढे येणाऱ्या सर्व निवडणुका अधिक ताकदीने आणि रणनीतीने लढवायच्या आहेत, हा संदेश आम्ही देत आहोत.” स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधून मिळालेला धडा आगामी राजकीय वाटचालीसाठी उपयोगी ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वक्तव्यावरून सुरू असलेल्या चर्चांवरही नितेश राणे यांनी भूमिका मांडली. “नारायण राणे यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला आहे. ‘निवृत्ती’ हा शब्द त्यांच्या डिक्शनरीतच नाही,” असे ठाम प्रतिपादन त्यांनी केले. राजकारणातून बाजूला होण्याचा कोणताही संकेत त्यांच्या वक्तव्यात नव्हता, असेही नितेश राणे यांनी स्पष्ट केले.

एकूणच, या मुलाखतीतून नितेश राणे यांनी राजकीय परिपक्वता, कौटुंबिक समन्वय आणि भविष्यातील निवडणुकांसाठीची तयारी याबाबत स्पष्ट संदेश दिला असून, आगामी काळात भाजप अधिक ताकदीने मैदानात उतरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा: Internet blackout in Iran : देशभरात अर्थव्यवस्थेच्या विरोधात तीव्र निदर्शने होत असताना इराणमध्ये इंटरनेट ब्लॅकआऊट

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number