Kankavli Sandesh Parkar : निलेश राणेंमुळे ठाकरे गटाचा उमेदवार विजयी, नितेश राणेंना धक्का

कणकवलीमध्ये नितेश राणेंना धक्का निलेश राणेंच्या पाठिंबामुळे ठाकरे गटाचे संदेश पारकर विजय 

Kankavli Sandesh Parkar : निलेश राणेंमुळे ठाकरे गटाचा उमेदवार विजयी, नितेश राणेंना धक्का

राज्यातील 23 नगर परिषदा आणि नगर पंचायतीच्या निवडणुकांचा आज निकाल लागणार आहे. राज्यातील 20 नगरपरिषदांची मतदान प्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्यामुळे उच्च न्यायालयाकडून सर्व नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचा निकाल 21 डिसेंबरला जाहीर करण्याचे निर्देश दिलेले. एकूण 143 सदस्यपदांच्या जागांसाठी ही निवडणूक असून, या निवडणुका दोन टप्प्यांत घेण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी उमेदवारांनी न्यायालयात दाखल केलेल्या अपिलांवर वेळेत निर्णय न झाल्याने त्या ठिकाणच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या.

अखेर या 23 नगर परिषदा आणि नगर पंचायतींसाठी 20 डिसेंबर रोजी मतदान आणि 21 डिसेंबर रोजी मतमोजणी घेण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान या निवडणुकांची मतमोजणी रविवारी, 21 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता सुरू झाली आहे. याचपार्श्वभूमिवर विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांचे निकाल पाहिल्यानंतर आज होणाऱ्या नगर परिषदा आणि नगर पंचायत निवडणुकीच्या निकालाचा कौल मतदारराजा कोणाच्या नावाने देणार हे पाहण महत्त्वाच ठरणार आहे. काही जागांचे कल येण्यास सुरूवाती झाली असून काही ठिकाणी धक्कादायक निकाल समोर आले आहेत.

हेही वाचा- Kokan Election Result 2025: कोकणात महायुतीचा झंझावात; भास्कर जाधवांना मोठा धक्का, तर रत्नागिरी-सिंधुदुर्गात भाजप-शिंदे सेनेचे वर्चस्व

अशातच तळकोकणातील सर्वांचे लक्ष मालवण, कणकवली नगरपंचायतीच्या मतमोजणीकडे लागलेले होते. कारण कणकवलीमध्ये भाजप विरुद्ध सर्व राजकीय पक्ष एकत्र अशी निवडणुक लढवण्यात आली. ज्यात कणकवलीमध्ये निलेश राणेंच्या पाठिंबामुळे ठाकरे गटाचे संदेश पारकर विजयी झाले असून नितेश राणेंना धक्का बसला आहे. कोकणातील मुख्य लढती पाहायच्या झाल्या तर कोकणातील सावंतवाडीत भाजपच्या श्रद्धा सावंत- भोसले, शिवसेना शिंदे गटाच्या नीता सावंत- कविटकर, शिवसेना ठाकरे गटाच्या सीमा मटकर, काँग्रेसच्या साक्षी वंजारी यांच्यात लढत रंगलेली आहे.

तसेच कणकवली नगरपरिषदत भाजपचे समीर नलावडे, शिवसेना ठाकरे गटाचे आणि व शिंदे शिवसेना शहर विकास आघाडीच उमेदवार संदेश पारकर यांच्यात लढत रंगलेली ज्यात निलेश राणे यांच्या पाठिंबामुळे शिवसेनेच्या संदेश पारकर यांचा विजय झाला आहे. तप दुसरीकडे मालवणमध्ये नितेश राणे आणि निलेश राणे या दोन भावांमध्ये जुंपली पाहायला मिळत असून भाजपच्या शिल्पा खोत, शिवसेना शिंदे गटाच्या ममता वराडकर आणि शिवसेना ठाकरे गटाच्या पुजा करलकर यांच्यात चुरस रंगलेली आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number