नितेश राणेंच्या अटकपूर्व जमीन अर्जावर गुरुवारी सुनावणी

संतोष परब हल्ल्याप्रकरणी भाजप आमादर नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामीनावरील युक्तिवाद संपला असून, अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी उद्या होणार आहे. नितेश राणेंवरील अटकेची टांगती तलवार कायम असून आता त्यांच्या जामीन अर्जावर गुरूवारी सुनावणी होणार आहे. त्यामुळे उद्या न्यायलयात नितेश राणे यांना ‘जेल की बेल’ हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. न्यायालयातील सरकारी वकीलांचा युक्तिवाद सरकारी वकील […]

नितेश राणेंच्या अटकपूर्व जमीन अर्जावर गुरुवारी सुनावणी

संतोष परब हल्ल्याप्रकरणी भाजप आमादर नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामीनावरील युक्तिवाद संपला असून, अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी उद्या होणार आहे.

नितेश राणेंवरील अटकेची टांगती तलवार कायम असून आता त्यांच्या जामीन अर्जावर गुरूवारी सुनावणी होणार आहे. त्यामुळे उद्या न्यायलयात नितेश राणे यांना ‘जेल की बेल’ हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

न्यायालयातील सरकारी वकीलांचा युक्तिवाद

सरकारी वकील घरत यांनी नितेश राणे तपासात सहकार्य करत नसल्याचे सांगितले आहे. तसेच संतोष परब हल्ल्यावेळचे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न आरोपींनी केला असल्याचा दावा सरकारी वकील घरत यांनी केला आहे. संतोष परबांवरील हल्ल्याआधी आरोपींकडून ७ फोनचा वापर केला असल्याचेही घरत यांनी सांगितले. तर नितेश राणे यांना जामीन देऊ नका अशी मागणीही सरकरी वकील घरत यांनी केली आहे.

नितेश राणेंच्या वकीलांचा युक्तिवाद

नितेश राणे यांचे वकील संग्राम देसाई यांनी न्यायालयात युक्तिवाद लढवला. यावेळी सरकारी वकील हवेत युक्तिवाद करतात, असा दावा राणेंचे वकील संग्राम देसाई यांनी केला आहे. नितेश राणेंना अटक केली नाही तर मोर्चा काढू असा दबाव आमदार वैभव नाईक पोलिसांवर आणत असल्याचे ते यावेळी म्हणाले. वैभव नाईकांनी दिलेला इशारा म्हणजे पोलिसांवर दबाव असे राणेंचे वकील संग्राम देसाई यांनी न्यायालयात सांगितले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number