BMC Election 2026 : मोठी बातमी! ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात निलेश राणे तळ ठोकणार

वरळी, शिवडी, लालबाग, माहीम या शिवसेना ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात निलेश राणे मैदानात

BMC Election 2026 : मोठी बातमी! ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात निलेश राणे तळ ठोकणार

महाराष्ट्रात नगरपरिषद आणि नगरपालिका निवडणुकांनंतर आता सर्वांच लक्ष लागलं आहे ते मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या निकालावर. कोण आपल्या पक्षाचा झेंडा मुंबई महानगपालिकेवर फडकवणार याकडे संपुर्ण मुंबईकरांच लक्ष लागून राहिलेलं आहे. अशातच काल उमेदवारी अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस होता. शेवटच्या क्षणापर्यंत अनेकठिकाणी यावरुन गोंधळ पाहायला मिळाला. मुंबईत एकूण 2516 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

हेही वाचा- Kripashankar Singh On BMC Election : "मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार" भाजप नेत्याच्या वादग्रस्त विधानानंतर मुंबईकरांच्या भुवया उंचावल्या

मुंबईसह राज्यातील एकूण महापालिकांमध्ये 15 जानेवारी 2026 ला मतदान होईल तसेच 16 जानेवारी 2026 ला मतमोजणी होणार आहे. याचपार्श्वभूमिवर सर्वपक्षांनी आपापल्या उमेदवारांची यादी जाहीर केली असून ते जोरदार तयारीला लागले आहेत. तसेच या निवडणुकीत एकूण 227 प्रभागांसाठी मतदान होणार आहे. यानिमित्त अनेक पक्षांमध्ये ठरलेल्या ठिकाणी युती झाली असून काही ठिकाणी महायुती आणि मविआमधील पक्ष स्वतंत्र निवडणूक लढणार आहेत.

हेही वाचा- BMC Election : मुंबईत मतदानापूर्वीच महायुतीला दोन धक्के; 'या' कारणांमुळे उमेदवारांचे अर्ज बाद

निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर ठाकरे पक्षाला नाराज उमेदवारांनी पक्षाला दिलेल्या राजीनाम्यामुळे अनेक धक्के बसले आहेत. अशातच आता ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात निलेश राणे यांची एन्ट्री होणार आहे. तळ कोकणासह वरळी, शिवडी, लालबाग, माहीमची धुरा निलेश राणे यांच्या खांद्यावर देण्यात आली आहे. पुढचे 15 दिवस निलेश राणे ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात धडाडणार असून शिवसेना उमेदवारांसाठी निलेश राणे स्वत: मैदानात उतरणार आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number