Chiplun Shivsena Eknath Shinde : "हिंदुत्ववादी सरकार आमचं आहे, पण…" शिंदेंच्या नगरसेवकाचं हिंदूंबाबत स्फोटक विधान, नक्की काय बोलले?

चिपळूण येथे पार पडलेल्या हिंदू जनजागृती समितीच्या ‘कॉर्पोरेट जिहाद’ संवाद कार्यक्रमात शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक आणि चिपळूण नगर परिषदेचे पाणीपुरवठा सभापती निहार कोवळे यांनी आक्रमक वक्तव्ये केले आहेत.

Chiplun Shivsena Eknath Shinde : &quotहिंदुत्ववादी सरकार आमचं आहे, पण…&quot शिंदेंच्या नगरसेवकाचं हिंदूंबाबत स्फोटक विधान, नक्की काय बोलले?

रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथे पार पडलेल्या हिंदू जनजागृती समितीच्या ‘कॉर्पोरेट जिहाद’ संवाद कार्यक्रमात शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक आणि चिपळूण नगर परिषदेचे पाणीपुरवठा सभापती निहार कोवळे यांनी आक्रमक वक्तव्ये केले आहेत. ‘निवडून नाही आलो तरी चालेल, पण मुस्लिम मत नको’ त्यांनी केलेल्या या मुस्लिम मतांबाबतच्या वक्तव्यामुळे नव्या राजकीय व सामाजिक वादाची शक्यता वर्तावली जात आहे.

हेही वाचा- Sharad Pawar: “नेहरू जेवढे पंतप्रधान होते तेवढं कोणी होऊ शकत नाही” पवारांनी नेहरूंच कौतुक करत कोणाला दिल्या कानपिचक्या

एवढच नव्हे तर ‘कायदा-सुव्यवस्था आम्हीही बिघडवू शकतो’ असं म्हणत त्यांनी पोलिस प्रशासनाला थेट इशारा दिला आहे. निहार कोवळे यांनी पोलिस प्रशासनाला इशारा आणि मुस्लिम मतांवर केलेल्या या भाष्याने राजकीय वर्तुळात पडसाद उमटण्याची शक्यता असून स्फोटक भाषण चर्चेत आले आहे. 

चिपळुणात नगरसेवक निहार कोवळे आपल्या भाषणात म्हणाले की, “कायदा-सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी फक्त आमची नाही. शहरात हिंदूंचीच दहशत राहिली पाहिजे. आमच्या आया-बहिणींवर वाईट नजर टाकली, तर खांडोळी करू. हिंदुत्ववादी सरकार आमचं आहे, पण प्रशासन योग्य वागत नाही. मुस्लिम समाजाच्या मतांची आम्हाला गरज नाही. निवडून नाही आलो तरी चालेल.” दरम्यान त्यांनी केलेल्या या भाषणामुळे खळबळ माजली आहे, तर नव्या वादाची चिन्हे निर्माण झाली आहेत. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number