‘राजकीय घडामोडींचा प्रवास विधानसभा बरखास्तीच्या दिशेने…’

राज्यातील सत्ताधारी महाविकास आघडी सरकारवर मोठं संकट कोसळलं आहे. कट्टर शिवसैनिक एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंड पुकारला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. अशातच, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी धक्कादायक ट्विट केले आहे. संजय राऊत यांनी विधानसभा बरखास्त होण्याचे संकेत ट्विट द्वारे दिले आहे. संजय राऊत यांनी ट्विट केले की, ‘महाराष्ट्रातील […]

‘राजकीय घडामोडींचा प्रवास विधानसभा बरखास्तीच्या दिशेने…’

राज्यातील सत्ताधारी महाविकास आघडी सरकारवर मोठं संकट कोसळलं आहे. कट्टर शिवसैनिक एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंड पुकारला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. अशातच, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी धक्कादायक ट्विट केले आहे. संजय राऊत यांनी विधानसभा बरखास्त होण्याचे संकेत ट्विट द्वारे दिले आहे.

संजय राऊत यांनी ट्विट केले की, ‘महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधानसभा बरखास्तीच्या दिशेने…’

शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे हे ४० आमदारासह सूरत येथून आसामधील गुवाहाटीला स्थलांतरित झाले आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे ३३ आमदार आणि ६ अपक्ष आमदारांनी बंड पुकारला आहे.

दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील लोटस ऑपरेशन विषयी आणि राजकीय घडामोडींबाबत तसेच भाजप अंतर्गत कोणत्याही गोष्टींवर भाष्य न करण्याचे आदेश भाजप नेते, कार्यकर्त्यांना दिले आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number