अभिनेत्री नेहा धुपिया Bollywood मध्ये फारशी कमाल करू शकली नसली, तरी आपल्या बिनधास्त वागण्याबोलण्याबद्दल कायम चर्चेत असते. सध्या रोडीज रिव्होल्युशन या कार्यक्रमात ती रणविजय सिंग, प्रिंस नरूला, निखिल चिनप्पा (Nikhil Chinappa) यांच्यासोबत जजच्या खुर्चीवर बसली आहे. मात्र या कार्यक्रमात ती आपल्या स्त्रीमुक्तीवादाच्या (Feminist attitude) अतिरेकी विधानांमुळे ट्रोल होऊ लागली आहे. शो मध्ये स्वतः कोणताही टास्क न करणारी मात्र शो मध्ये येणाऱ्या उमेदवारांवर आगपाखड करत असते. अशाच एका इच्छुक स्पर्धकाला नेहाने (Neha Dhupia) सुनावल्यावर ती नेटकऱ्यांच्या Trolling चा विषय बनली आहे.
शो मध्ये आलेल्या एका मुलाने आपल्या गर्लफ्रेंडचे आपल्या व्यतिरिक्त 5 बॉयफ्रेंड्स (Boyfriends) होते हे कळल्यावर आपण तिच्यावर हात उचलल्याचं विधान केलं होतं. या विधानावर पेटून उठलेल्या नेहा धुपियाने मुलाला चांगलंच फैलावर घेतलं. यावेळी ‘मुलगी कितीही बॉयफ्रेंड्स ठेवू शकते, तो तिचा प्रश्न आहे.’ असं नेहा धुपिया म्हणाली.
‘तू ही जी बकवास करतोयस, की माझी गर्लफ्रेंड आणखी 5 बॉयफ्रेंड्ससोबत गेली होती. तर हा तिचा चॉईस आहे की तिने कोणासोबत जावं. तुझ्यातच कदाचित काही समस्या असेल. जर ती तुला चीट करून आणखी 5 बॉयफ्रेंड्स बनवते म्हणजे ती तुझ्यावर खुश नाही. तिने कितीही बॉयफ्रेंड्स फिरवले, तरी तुला तिच्यावर हात उचलायचा अधिकर नाही’ असं बडबडल्यानंतर आता नेहा धुपियाला ट्रोल केलं जातंय. तिच्या सोबत निखिल चिनप्पालाही ट्रोल केलं जातंय आणि रोडीजवरच (Roadies Revolution)बंदी घालायची मागणी होतेय.