NEET Paper Leak: नीट पेपरफुटी प्रकरणात खळबळजनक खुलासा; लातूरच्या डॉक्टरला अटक, ‘पालक’ म्हणून देशातील पहिली कारवाई?

नीट पेपरफुटी प्रकरणात लातूरच्या डॉक्टरला सीबीआयने पुण्यातून अटक केली.

NEET Paper Leak: नीट पेपरफुटी प्रकरणात खळबळजनक खुलासा; लातूरच्या डॉक्टरला अटक, ‘पालक’ म्हणून देशातील पहिली कारवाई?

देशभरात गाजत असलेल्या नीट पेपरफुटी प्रकरणात आता आणखी एक धक्कादायक घडामोड समोर आली आहे. लातूरमधील एका बालरोग तज्ज्ञ डॉक्टरला सीबीआयने पुण्यातून अटक केल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणात पालक म्हणून करण्यात आलेली ही देशपातळीवरील पहिली अटक असल्याचे सांगितले जात आहे. या कारवाईमुळे शिक्षण क्षेत्रात आणि वैद्यकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित डॉ. मनोज शिरुरे लातूरातील औसा रोड परिसरात बालरोग तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे. सीबीआयच्या तपासात या डॉक्टरचे नाव समोर आल्यानंतर त्यांची चौकशी करण्यात आली होती. याआधी अटकेत असलेला आरोपी पी. व्ही. कुलकर्णी आणि या डॉक्टरचे घनिष्ठ संबंध असल्याची माहिती तपास यंत्रणांच्या हाती लागल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

हेही वाचा:Crime News: भयंकर! भरचौकात दिवसाढवळ्या प्रॉपर्टी डीलरला 5 गोळ्या झाडून संपवलं; CCTV फुटेजमधील घटना पाहून पोलीस यंत्रणाही सुन्न

तपासादरम्यान या डॉक्टरने मागील तीन वर्षांपासून नीट परीक्षेच्या प्रश्नपत्रिका लीक करण्याच्या रॅकेटमध्ये सहभाग घेतल्याचा संशय सीबीआयला आहे. ओळखीच्या विद्यार्थ्यांना किंवा पालकांना प्रश्नपत्रिका पुरवल्या गेल्याचा कोनही तपासात समोर येत असल्याचे सांगितले जात आहे. या संपूर्ण प्रकरणात आर्थिक व्यवहार, संपर्क आणि कॉल डिटेल्सचीही चौकशी सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

सीबीआयने दोन दिवस संबंधित डॉक्टरची चौकशी केली होती. त्यानंतर त्यांना पुढील तपासासाठी पुण्यातील सीबीआय कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. चौकशीनंतर अटकेची प्रक्रिया पूर्ण करून त्यांना पुण्यातून अटक करण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

हेही वाचा: Pune Crime: पुणे बालाजीनगर अक्षय म्हस्के गोळीबार प्रकरण; आंदेकर टोळीवर गुन्हा दाखल, सहा आरोपींना अटक

नीट पेपरफुटी प्रकरणामुळे आधीच देशभरातील विद्यार्थी आणि पालकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ झाल्याचा आरोप होत असताना आता थेट पालक आणि डॉक्टरांचे नाव समोर आल्याने या प्रकरणाची व्याप्ती अधिक गंभीर असल्याचे स्पष्ट होत आहे.

दरम्यान, सीबीआयकडून या प्रकरणात आणखी काही मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. लीक रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास सध्या वेगाने सुरू असून आगामी काळात आणखी अटकसत्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number