पुण्यातील क्लाईन मेमोरियल शाळेत पालकांना झालेल्या मारहाण प्रकरणानंतर आता शाळांविरोधात कडक कारवाई करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. शिवसेना नेत्या आणि विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली आज शिक्षण संचालक आणि उपसंचालकांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत काही महत्वाचे निर्णय झाले असून, पुण्यातील ३३ शाळांची चौकशी करून कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले असल्याची […]
पुण्यातील क्लाईन मेमोरियल शाळेत पालकांना झालेल्या मारहाण प्रकरणानंतर आता शाळांविरोधात कडक कारवाई करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. शिवसेना नेत्या आणि विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली आज शिक्षण संचालक आणि उपसंचालकांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत काही महत्वाचे निर्णय झाले असून, पुण्यातील ३३ शाळांची चौकशी करून कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले असल्याची माहिती समोर आली आहे.