Eknath Khadse : ‘एकही मंत्री शेतकऱ्यांचे अश्रू पुसायला आलेले नाहीत’, अवकाळी पावसामुळे झालेल्या शेती नुकसानीवरून खडसेंची टीका

राज्यातील जळगाव, अकोला, बुलढाणा आणि सोलापूर जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे सर्वाधिक नुकसान झाले. याचपार्श्वभूमिवर माजी मंत्री आणि शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. 

Eknath Khadse : ‘एकही मंत्री शेतकऱ्यांचे अश्रू पुसायला आलेले नाहीत’, अवकाळी पावसामुळे झालेल्या शेती नुकसानीवरून खडसेंची टीका

राज्याच्या काही भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊसामुळे शेती पिकांना मोठा फटका बसला आहे. 1 मे ते 8 जून या काळात झालेल्या उन्हाळी पाऊस, वादळी वारे आणि अति तापमानामुळे राज्यात महिना भरात 53 हजार हेक्टर पिकांचे नुकसान झाले. राज्यातील एकूण 34 जिल्हे बाधित झाले असून जून महिन्यात 17,932 आणि मे महिन्यात 40,215 हेक्टर शेती पिकांचे नुकसान झाले.

जळगाव, अकोला, बुलढाणा आणि सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झाले. यामध्ये केळी उत्पादकांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे. याचपार्श्वभूमिवर माजी मंत्री आणि शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. 

हेही वाचा- Chiplun Shivsena Eknath Shinde : “हिंदुत्ववादी सरकार आमचं आहे, पण…” शिंदेंच्या नगरसेवकाचं हिंदूंबाबत स्फोटक विधान, नक्की काय बोलले?

“कोट्यवधीचे नुकसान शेतकऱ्यांचं झाले 4 मंत्री असून रक्षा खडसे वगळता या मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली नाही. या मंत्र्यांना विधान परिषदेच्या घोडेबाज करण्यात रस जास्त आहे मात्र शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. शेतकऱ्यांचा नुकसान झालं माझे नुकसान झाला आहे. शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे, माझेही नुकसान झालं आहे.

वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसामुळं केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. अनेक शेतकऱ्यांची पिक भूईसपाट झाली आहेत. विक्रीसाठी तयार झालेला माल या वादळी वाऱ्याने आणि पावसामुळं मातीमोल झाला आहे. यामुळं शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. जिल्ह्यात मंत्री असूनही त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली नाही. ” असं म्हणत नाव न घेता जिल्ह्यांच्या मंत्र्यांवर एकनाथ खडसेंनी टीका केली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number