पुण्यात इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन

पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. पुण्यात इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादीतर्फे आंदोलन करण्यात आले. पुण्यातील बालगंधर्व नाट्यगृहपासून अलका टॉकीज चौकापर्यंत हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान, केंद्र सरकारचा निषेध म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसकडून गोड्या बैलगाडी सायकली आणि गाड्या लोटात आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे सुमारे तीनशे ते चारशे कार्यकर्ते सहभागी झाले होते. गेल्या […]

पुण्यात इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन

पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. पुण्यात इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादीतर्फे आंदोलन करण्यात आले. पुण्यातील बालगंधर्व नाट्यगृहपासून अलका टॉकीज चौकापर्यंत हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान, केंद्र सरकारचा निषेध म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसकडून गोड्या बैलगाडी सायकली आणि गाड्या लोटात आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे सुमारे तीनशे ते चारशे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये वाढ सुरूच आहे. आज पेट्रोल-डिझेलच्या दरात प्रत्येकी ८४-८४ पैशांची वाढ करण्यात आली आहे. गेल्या १० दिवसांमध्ये नवव्यांदा इंधनात दरवाढ करण्यात आली आहे. त्यामुळे नव्या दरवाढीनुसार, पुण्यात पेट्रोलचे दर प्रतिलिटर ११५.३७ रुपये झाले आहे तर डिझेल ९८.१२ प्रतिलिटर रुपये झाले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number