राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली यादी जाहीर

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पहिली यादी जाहीर झाली. या यादीतून राष्ट्रवादीने ३८ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली यादी जाहीर

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पहिली यादी जाहीर झाली. अजित पवार बारामती या परंपरागत मतदारसंघातून निवडणूक लढवतील. यादीतून राष्ट्रवादीने अजित पवारांसह ३८ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. राज्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व मंत्र्यांचा या यादीत समावेश करण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यातील वडगाव शेरी मतदारसंघाचे आमदार सुनील टिंगरे यांच्या नावाचा या यादीत समावेश झालेला नाही. नवाब मलिक आणि त्यांची मुलगी सना या दोघांचाही पहिल्या यादीत उल्लेख दिसत नाही.

  1. बारामती- अजित पवार
  2. येवला- छगन भुजबळ
  3. आंबेगाव- दिलीप वळसे पाटील
  4. कागल- हसन मुश्रीफ 
  5. परळी- धनंजय मुंडे
  6.  दिंडोरी- नरहरी झिरवाळ
  7. अहेरी- धर्मरावर बाबा अत्राम
  8. श्रीवर्धन-  आदिती तटकरे
  9. अंमळनेर- अनिल भाईदास पाटील
  10.  उदगीर- संजय बनसोडे 
  11. अर्जुनी मोरगाव- राजकुमार बडोले
  12. माजलगाव- प्रकाश दादा सोळंके
  13. वाई- मकरंद पाटील
  14. सिन्नर- माणिकराव कोकाटे
  15. खेड आळंदी – दिलीप मोहिते पाटील
  16. अहमदनगर शहर- संग्राम जगताप
  17.  इंदापूर- दत्तात्रय भरणे
  18. अहमदपूर- बाबासाहेब पाटील
  19.  शहापूर- दौलत दरोडा
  20.  पिंपरी- अण्णा बनसोडे
  21.  कळवण- नितीन पवार
  22. कोपरगाव- आशुतोष काळे
  23. अकोले – किरण लहामटे
  24. वसमत- चंद्रकांत उर्फ राजू नवघरे
  25. चिपळूण- शेखर निकम
  26. मावळ- सुनील शेळके
  27. जुन्नर- अतुल बेनके
  28. मोहोळ- यशवंत माने
  29.  हडपसर- चेतन तुपे
  30.  देवळाली- सरोज आहिरे
  31. चंदगड – राजेश पाटील
  32. इगतुरी- हिरामण खोसकर
  33. तुमसर- राजे कारमोरे
  34. पुसद -इंद्रनील नाईक
  35. अमरावती शहर- सुलभा खोडके
  36. नवापूर- भरत गावित
  37.  पाथरी- निर्णला विटेकर
  38. मुंब्रा-कळवा- नजीब मुल्ला

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number