पुणे : सरकारच्या कल्याणकारी योजनांची माहिती देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं व्हिडीओ तयार केला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून योजनांची माहिती देताना अजित पवारांचाच प्रचार केला जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या व्हिडीओवरुन महायुतीत श्रेयवादाची ठिणगी पडण्याची शक्यताही राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे.
राष्ट्रवादीचा अॅनिमेटेड व्हिडीओ व्हायरल
गणेशोत्सवाच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेसनं सरकारच्या कल्याणकारी योजनांचा प्रचार प्रसार करण्यासाठी एक अॅनिमेटेड व्हिडीओ प्रसिद्ध केलाय. हा व्हिडीओ समाजमाध्यमात वेगानं व्हायरल होतोय.
पालक विश्वाचा बाप्पा माझा, आशीर्वाद माझ्यावरी,
विद्यादाता, विघ्नहर्ता, दया सागराची कृपादृष्टी सर्वांवरी,
मी केवळ एक माध्यम, देणारा तोचि लंबोदर, विनायक,
अशीच जनसेवा घडत राहो गजवदना, मी तुझा बालक!#GaneshChaturthi pic.twitter.com/mZBhRvBLgH — Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) September 7, 2024