NCP Sunetra Pawar: भाजपच्या नकारामुळे सुनेत्रा पवार यांच्यासमोर मोठा पेच; राज्यसभेच्या एका जागेमुळे मोठे फेरबदल होणार

राष्ट्रवादीच्या अध्यक्षा आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारताच सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यामुळे या जागेसाठीवरून अंतर्गत वाद पाहायला मिळत आहे.

NCP Sunetra Pawar: भाजपच्या नकारामुळे सुनेत्रा पवार यांच्यासमोर मोठा पेच; राज्यसभेच्या एका जागेमुळे मोठे फेरबदल होणार

सध्या राज्यात विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर महायुतीमध्ये जागा वाटपावरून रस्सीखेच सुरु आहे. अशातच अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या अध्यक्षा आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारताच सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यामुळे राज्यसभेच्या सदस्यत्वाच्या जागेसाठीच्या पोटनिवडणुकीवरून राष्ट्रवादीच्या 5 बड्या नेत्यांची लॉबिंग पाहायला मिळत आहे.

या जागेसाठी राष्ट्रवादीने अविनाश आदिक आणि सुबोध मोहिते ही नावे सुचवली होती, ज्यांना भाजपने नकार दिला आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीने सुचवलेल्या नावांवर भाजापने नाराजी व्यक्त केल्यामुळे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी स्वत: या रेसमध्ये आघाडीवर आले आहेत.

हेही वाचा- Radhakrishn Vikhe Patil : मनोज जरांगे आंदोलन मागे घेणार? राधाकृष्ण विखे पाटील यांचं मोठं वक्तव्य

जर छगन भुजबळांची वर्णी रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी लागली तर महाराष्ट्रातील त्यांच्या रिक्त होणाऱ्या कॅबिनेट मंत्रीपदासाठी धनंजय मुंडे यांची आग्रही भूमिका पाहायला मिळेल. तर दुसरीकडे भुजबळांची इच्छा काही वेगळीच आहे. त्यांचे होणारे रिक्त कॅबिनेट मंत्रीपद पक्षातील इतर कोणत्या नेत्याला न मिळता त्यांचेच पुतणे समीर भुजबळ यांना मिळावे अशी इच्छा भुजबळांची आहे. 

इतकेच नव्हे तर रमी प्रकरणामुळे माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेवर ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांना संधी मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. आगामी राज्यसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत, विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि भाजपमध्ये प्रचंड पडद्यामागे घडामोडी घडत असताना राज्यसभेच्या एका जागेमुळे आणखी एक मोठा ट्विस्ट येण्याची शक्यता आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number