महाआघाडी सरकारने नुकतीच खातेवाटप जाहीर केलं. या खातेवाटपात राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे यांना उद्योग, पर्यटन, क्रिडा, खनिकर्म, फलोत्पादन तसेच माहीती व जनसंपर्क ही खाती मिळाली.
ही सर्व खाती मिळाल्याने आदिती तटकरे यांनी आनंद व्यक्त केला आहे.
काय म्हणाल्या आदिती तटकरे ?
राज्यमंत्रीपदाची जबाबदारी दिल्याने आदिती तटकरे यांनी शरद पवारांचे आभार मानले. तसेच कोकणाचे प्रतिनिधित्व करताना पर्यटन आणि उद्योग सारख्या खात्यांतून जास्तीत जास्त विकास करण्याचा विश्वास यावेळी आदिती तटकरे यांनी व्यक्त केला.
अधिक वाचा : महाविकासआघाडीच्या मंत्र्यांना सरकारी बंगल्यांचे वाटप
तसेच बेरोजगारी कमी करण्यावर प्राधान्य देणार, तसेच तरूणांना क्रीडा क्षेत्रात प्रगती करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही आदिती म्हणाल्या.
विशेष म्हणचे आमदार म्हणून आदिती तटकरे यांची ही पहिलीच वेळ. यासह त्यांना पहिल्याच झटक्यात राज्यमंत्रिपदाची लॉटरी लागली.
अधिक वाचा : महाविकासआघाडीचं बहुप्रतिक्षित खातेवाटप जाहीर
आदिती तटकरे या श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. काही दिवसांपूर्वी महाविकासआघाडीच्या मंत्र्यांना बंगले आणि दालन वाटप करण्यात आलं.
अधिक वाचा : कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांना दालन वाटप, ‘या’ मंत्र्यांवर अन्याय
यामध्ये आदिती तटकरे यांना मंत्रालयातील तळमजल्यावरील मुख्य (2) हे दालन देण्यात आलं आहे.
तर सुनिती-10 हा शासकीय बंगला आदिती तटकरे यांना मिळाला आहे.