NCP Press Conference: राष्ट्रवादीकडून पत्रकार परिषदेत मोठी घोषणा!सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या पदांबाबत दिलं स्पष्टीकरण

मदार रोहित पवार यांच्या आरोपांवर राष्ट्रवादीचे नेते अविनाश आदिक आणि उमेश पाटील यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिले आहे. 

NCP Press Conference: राष्ट्रवादीकडून पत्रकार परिषदेत मोठी घोषणा!सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या पदांबाबत दिलं स्पष्टीकरण

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये अंगर्गत वाद असल्याच्या चर्चा सुरू आहेत. पक्षातील वरिष्ठ नेत्यांमध्ये वाद असल्याचेही समोर आले आहे.  अशातच आता आमदार रोहित पवार यांच्या आरोपांवर राष्ट्रवादीचे नेते अविनाश आदिक आणि उमेश पाटील यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिले आहे. 

अविनाश आदिक यांनी म्हटले की, “मी पक्षाचा राष्ट्रीय सचिव आहेस त्यामुळे मी गेल्या अनेक महिन्यांपासून दिल्लीला जातो आणि पक्षाच्या कार्यालयच काम सांभाळतो. पण गेले काही आठवडे मी गेलो नव्हतो, काल मी दिल्लीतील पक्षकार्यालयात गेलो होतो. काल माझ्या नावाने एका वृत्तपत्राने एक बातमी दिली होती की, मी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना दिल्लीच्या पक्षाच्या कार्यालयात बंदी घातली आहे. पण यासंदर्भात असं काही नाही, माझ्या विरोधात काही लोकांनी हे केल आहे. त्यामुळे ज्या वृत्तपत्राने ही बातमी दिली आहे, त्यासंदर्भात आम्ही कायदेशीर बाब तपासून आम्ही अब्रूनुकसानीचा दावा करणार आहोत”.

उमेश पाटील यांनी सांगितले की, “का वृत्तपत्रात पक्षाच्या संदर्भातील चुकीच्या संदर्भात बातम्या आल्या होत्या. सुनील तटकरे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि ते राहणार आहेत. प्रफुल्ल पटेल हे कार्याध्यक्ष आहेत आणि कायम राहणार आहेत याची नोंद पत्रकारांनी घ्यावी. पक्षाची राष्ट्रीय कमिटी आत्ता जाहीर झाली आहे त्यामुळे पक्षामध्ये काही बदल करायचे असतील तर तो निर्णय राष्ट्रीय कमिटी घेणार आहे”.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number