नवी दिल्ली : राष्ट्रवादी अजित पवार गटाची राष्ट्रीय कार्यकारणी यादी जाहीर झाली. त्यामध्ये ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल, सुनील तटकरे, धनंजय मुंडे, छगन भुजबळ तसेच हसन मुश्रीफ यांना वगळून सुनेत्रा पवार, जय पवार आणि पार्थ पवारांनी राष्ट्रवादीच्या आर्थिक चाव्या आपल्या हातात घेतल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. तर राष्ट्रवादीवर संपूर्ण पकड पवार कुटुंब निर्माण करत आहेत यादीत स्पष्ट समजत आहे.
राष्ट्रीय कार्यकारणीच्या यादीत पार्थ आणि जयवर कोणती जबाबदारी?
राष्ट्रवादीची राष्ट्रीय कार्यकारणीची यादी जाहीर करण्यात आली त्यामध्ये सुनेत्रा पवार राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष असा उल्लेख करण्यात आला तर पार्थ पवार यांना राष्ट्रवादीचे महासचिव आणि जय पवारांना राष्ट्रीय सचिवपद देण्यात आले. पार्थ पवारांना पक्ष समन्वयाची जबाबदारी तर जय पवार यांना राष्ट्रीय शिस्त पालन समितीचे अध्यक्ष पदाची जबाबदारी देऊन खजिनदाराची जबाबदारी सुद्धा देण्यात आली आहे. तटकरे आणि पटेलांना डच्चू देत शिवाजीराव गर्जे यांना खजिनदारपद कायम ठेवण्यात आले. त्यांच्याकडे लेखापरीक्षण आणि हिशोबाचे काम देण्यात आले आहे. तसेच यादीत सर्व अर्थ अधिकार पवार कुटुंबाकडे असल्याचे स्पष्ट दिसून येते.
तटकरे, प्रफुल पटेल, भुजबळ यादीवरून सुनेत्रा पवारांवर नाराज?
यादी जाहीर झाल्यानंतर ज्येष्ठ नेत्यांना वगळून आताच राजकारणात आलेल्या जय पवार आणि पार्थ पवार यांच्यावर राष्ट्रीय कार्यकारणीत मोठं स्थान देण्यात आल्यामुळे राष्ट्र्वादीतील अनेक मोठे नेते नाराज असल्याचं समजलं जात आहे. त्यामध्ये अजितदादांच्या मृत्यू नंतर म्हणजेच २८ जानेवारीनंतर निवडणूक आयोगासोबत झालेले सर्व पत्र व्यवहार सुनेत्रा पवारांनी १० मार्चला आयोगाला पत्र पाठवून रद्द करण्यात सांगितले होते त्यामुळे देखील तटकरे आणि पटेल प्रचंड नाराज असल्याचे दिसून आले.
यादीत तांत्रिक चूक असल्याचं सुनेत्रा पवारांकडून स्पष्टीकरण
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवीन राष्ट्रीय कार्यकारिणीवरुन मोठा राजकीय गोंधळ निर्माण झाल्याचे चित्र आहे. निवडणूक आयोगाला दिलेल्या कार्यकारणीच्या यादीत प्रफुल पटेल, सुनील तटकरे छगन भुजबळ, हसन मुश्रीफ यांचे नाव नसल्यामुळे एकाच गोंधळ निर्माण झाला. सुनेत्रा पवारांनी लगेच मध्यरात्री ट्विट करत या यादीमध्ये तांत्रिक चूक असल्याचे स्पष्टीकरण दिले पण तटकरे आणि पटेलांची नाराजी कायम आहे असं सूत्रांकडून समजले आहे.
तटकरे आणि शरद पवारांची अचानक सिल्वर ओकवर भेट
अजितदादांच्या मृत्यूनंतर विलीनीकरणाला तटकरे आणि पटेलांचा तीव्र विरोध होता, पवार गट आणि दादा गटाकडून एकमेकांवर वार पलटवार करण्यात येत होते. पण त्यात अचानक सुनील तटकरेंनी अचानक सिल्वर ओकवर जाऊन शरद पवारांची भेट घेतल्यामुळे राज्यात एकाच खळबळ उडाली त्यात यादीतून नाव कमी झाल्यामुळे या भेटीला वेगळं स्वरूप प्राप्त झालं आहे.