महाराष्ट्रात सध्या बिबट्यांनी धुमाकूळ घातला आहे, राज्यात बिबट्याची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे. राज्याच्या विविध भागांमध्ये सध्या बिबट्यांचा मुक्तसंचार दिसून येत आहे. पुणे, अहिल्यानगर, नाशिक आणि सह्याद्रीच्या कडेला बिबट्याचा वावर वाढला आहे. महाराष्ट्रातील बिबट्यांच्या हल्ल्यामागे ‘गुजरात’चा हात आहे. गुजरातमध्ये रेस्क्यु केलेले बिबटे महाराष्ट्राच्या सीमेवर सोडतात. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार निलेश लंके यांनी हे गंभीर आरोप केले आहेत.
अलीकडेच बिबट्यांच्या हल्ल्यांची संख्या वाढलेली असताना निलेश लंके यांनी हे वक्तव्य केलेलं आहे. यावेळी निलेश लंके म्हणाले की, “मला तर अशी एक बातमी कळाली आहे. गुजरात परिसरात सोडलेले बिबटे हे महाराष्ट्राच्या सीमारेषेवर सोडले आहेत. नाशिकमध्ये पण बिबट्यांचा वावर जास्त वाढला आहे. गुजरात आणि सापुतारा सीमारेषा आहे त्या भागात बिबटे आणुन सोडले आहेत. म्हणून ते बिबटे सगळे महाराष्ट्राच्या या भागात आलेले आहेत.”