देशात सध्या कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आलं आहे. कोरोनामुळे आतापर्यंत राज्यात ५ जणांचा मृत्यू झाला आहे. या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे आज (२७ मार्च) जनतेशी सकाळी ११वाजता संवाद साधणार आहेत. याबाबतची माहिती शरद पवार यांनी ट्विटद्वारे दिली आहे.
शरद पवार या फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी वैद्यकीय सुविधा, आर्थिक संकट, कृषी उत्पन्न, कायदा आणि सुव्यवस्था, कामगारांच्या समस्या अशा आव्हानांबाबत लोकांशी संवाद साधणार आहे.
दरम्यान राष्ट्रवादीने कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेतला आहे.
राष्ट्रवादीचे सर्व आमदार आणि खासदार आपल्या १ महिन्याचं पगार मुख्यमंत्री/पंतप्रधान सहाय्यता निधीला देणार आहेत.